अक्षय तृतीयेचा मुहर्ताला सोने खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी

  • Written By: Published:
अक्षय तृतीयेचा मुहर्ताला सोने खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी

सोन्याच्या भावात झालेल्या वाढीनंतरचा अक्षय्य तृतीया पहिलाच मुहूर्त. ग्राहकांनी सोनं हा अक्षय संपत्तीचा गुंतवणूक पर्याय निवडल्याचे दिवसभरात दिसले. त्यामुळे सोन्याचे भाव चढे असून देखील विक्रीत 5 ते 10 टक्के वाढ झाली. सकाळपासूनच बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते व ते कायम राहीले. लग्नसराईच्या खरेदीचा मुहूर्तही अनेकांनी केला. सर्वच प्रकारचे दागिने, सोन्याच्या तारा, नाणी, बिस्किट आदींना मागणी होती. यावर्षी हिऱ्याच्या दागिन्यांना तरुणाई कडून विशेष पसंती असल्याचे दिसले.

मागील वर्षी अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दर 50 हजार रूपयांवर असलेले सोने यंदा 60 हजाराच्या पार पोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने हे दर खूप जास्त होते. त्यामुळे यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत सोन्याची खरेदी कमी झाली. दर जास्त असल्याने ग्राहकांनी या मुहूर्तावर सोन्याची खरेदी केली परंतु कमी प्रमाणात.

Breaking news ; सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना कोरोनाची लागण

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याचे भाव जवळपास 20 टक्क्यांनी वाढले होते. परंतू, चांगल्या मुहुर्तावरील खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. कमी वजनाच्या दागिन्यांसह नैसर्गिक हिरे, 18 आणि 24 कॅरेटच्या दागिण्यांना विशेष मागणी होती. पाच वर्षांत जवळपास दुप्पट परतावा देणाऱ्या सोन्याकडे नागरिक सुरक्षित गुतंवणूक म्हणून पाहत आहे. यंदा रूपयांमध्ये होणारी उलाढाल 25 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube