Bachchu Kadu on Nanded Hospital Death : सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Hospital Death) एकाच दिवशी 24 जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आणखी सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 41 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यातच सरकारमधील आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनीही या प्रकरणाची सीबीआय (CBI चौकशी करा, अशी मागणी केली.
हार्दिक पांड्याला दुखापत! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याला मुकणार; कोण उतरणार मैदानात?
नांदेड दुर्घटनेवरून उद्धव ठाकरेंनी सरकारचे चांगलेच वाभाडे काढले होते. ज्या आरोग्य यंत्रणेनं कोरोना यशस्वीपणे काम केलं. त्याची आज सरकार बदलल्यांतर दुर्देशा झाली, अशी टीका त्यांनी केली. याविषयी बच्चू कडू यांनी विचारलं असता ते म्हणाले, हा राजकीय मुद्दा नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरोग्य यंत्रणा चांगली होती असे म्हणता येणार नाही. तेव्हाही बजेट तेवढेच होते. तेव्हाही आरोग्य यंत्रणेतील रिक्त जागा तेवढ्याच होत्या. उद्धव ठाकरेंकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांनी हा विषय राजकीय करू नये कोणी. हा विषय व्यवस्थेचा आहे. 75 वर्षांपासून व्यवस्था ढिसाळ झाली आहे. याला सर्वच पक्ष जबाबदार आहेत, असं ते कडू म्हणाले.
अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री निधीच बंद होता. अडीच वर्षात ज्या रुग्णांना मदत मिळायला पाहिजे होती, त्यांना पाच टक्के निधी सुद्धा वाटप झाला नाही. आता त्याच्या चारपट वाटप झालं. आरोग्य, शिक्षण बाबतीत सगळेच सरकार दोषी आहे. राजकीय पक्षांचे जर कार्यालय होतात तर हॉस्पिटल बांधायला काय हरकत आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. याविषयी कडू यांना विचारलं असता ते म्हणाले,
सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, जी चौकशी करायची ती करा, चौकशीच झालीच पाहिजे, या मताचा मी आहे. पण चौकशी करून प्रश्न मिटत नाही. व्यवस्थेमध्ये बदल होणे गरजेचे आहे. समान आरोग्य सुविधा मिळावी पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.
संजय राऊतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. त्यावरही बच्चू कडू यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, कोणत्या मुख्यमंत्र्यांना वाटते की माझ्या कारकिर्दीत शेकडो लोक मेले पाहिजेत म्हणून. मरण पावलेल्या लोकांचे अनुषंगाने राजकीय नेत्यांना टार्गेट करण्याची भूमिका बदलली पाहिजे. कोणत्या वेळेस कोणती स्टेटमेंट करावी, याचं भान असावं. व्यवस्था बदलण्यासाठी आपण एकत्र बसून कारवाई करणे गरजेचे आहे. अशा घटनेत राजकीय आरोप करू नये, एकत्रित बसून काम केले पाहिजे, असं कडू म्हणाले.
अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं प्रफुल्ल पटेल सांगत आहेत. यावर विचारलं असता ते म्हणाले की, सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायचे कोणाला ग्रामपंचायत सरपंच व्हायचे.