Download App

बीडमधील दहशत कायम! संतोष देशमुख हत्येच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला मारहाण

एका तरुणाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहिल्याने त्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Beed Crime : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh Case) हत्येच्या प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या प्रकरणी काही आरोपी अटकेत आहेत. मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याचा ठावठिकाणा अजून लागलेला नाही. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी मिळाली आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांकडून एका तरुणाला मारहाण झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर बीडमधील दहशत अजूनही कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे. जखमी तरुणाला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहिल्याने त्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कोणीही असू दे, संतोष देशमुखांच्या प्रत्येक मारेकऱ्यावर कारवाई होणार! CM फडणवीसांचा बीडमध्ये जाऊन इशारा

या घटनेची माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले आहेत. मारहाण करणाऱ्या दोघा जणांवर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही या प्रकरणी गंभीर दखल घेत धारुर पोलिसांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत आहे. सध्या येथील परिस्थिती तणावाचीच असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

अशोक शंकर मोहिते हा युवक मोबाइलवर संतोष देशमुख हत्याकांडाच्या बातम्या पाहत होता. याच दरम्यान दोघा जणांनी आमच्या बातम्या का पाहतोस असे त्याला विचारले. तू येथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी या दोघांनी दिली. त्यानंतर या तरुणाला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांकडून या दोघा जणांचा शोध घेतला जात आहे.

संदीप क्षीरसागर अन् कृष्णा आंधळेचे संबंध.. धनंजय मुडेंचा पलटवार; राजीनाम्यावरही भाष्य..

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येतील आरोपींच्या अटकेसाठी मोठा सामाजिक दबाव निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि अन्य काही जणांना अटक केली होती. वाल्मिक कराडवरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याच्यावर मोक्काही लावण्यात आला. मात्र या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

follow us