Download App

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का!

  • Written By: Last Updated:

बीड – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. जयसिंग सोळंके यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोळंके कुटूंब पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. यातच आता जयसिंग सोळंके यांनी राजीनामा दिल्यामुळे बीडच्या राजकारणात राजीनाम्याची चर्चा रंगली आहे. जयसिंग सोळंके हे आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत.

आमदार प्रकाश सोळंके हे पक्षाचे ज्येष्ठ सदस्य असतानाही त्यांना राष्ट्रवादीकडून अनेकदा डावलण्यात आलं. त्यांना मंत्रिपदाची संधी देखील देण्यात आली नाही. साखरसंघाच्या अध्यक्षपदी आमदार सोळंके यांची वर्णी लावण्यात येणार होती, मात्र तिथेही पक्षाने उपाध्यक्ष पदावर त्यांची बोळवण केली.

4-5 दिवसांपूर्वी शिक्षक आमदार निवडणुकीसंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीतही आमदार सोळंके दिसले नाहीत. त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती.आज अखेर त्यांचे पुतने जयसिंग सोळंके यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Tags

follow us