Beed Crime : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Beed Crime) सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे बीड जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणांचा विचार करता कदाचि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या आवारात गर्दी होत असल्याने पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
बीड प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतिक घुले, सिद्धार्थ सोनवणे व अन्य एक जणाची पोलीस कोठडी आज संपणार आहे. यातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. परंतु, अजूनही तो हाती आलेला नाही. कृष्णा आंधळेच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दिंडोरीच्या आश्रमात वाल्मिकचा मुक्काम, सीआयडी पण तिथं गेली होती : तृप्ती देसाईंचा नवा बॉम्ब
खंडणीप्रकरणात वाल्मिक कराडलाही (Walmik Karad) अटक करण्यात आली आहे. तसेच बीड प्रकरणी त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. केज न्यायालयाने कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर त्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याच्या या जामीन अर्जावर आज न्या. एसव्ही पावसकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्यां प्रकरणाला 24 दिवस होऊनही अद्याप तीन आरोपी फरार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एसआयटीची घोषणा केली होती. शुक्रवारी सकाळी एसआयटीची टीम बीड जिल्ह्यातील केजमध्ये दाखल झाली आणि संध्याकाळी बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. सध्या पुढील कारवाई सुरू आहे. गृह विभागाकडून अधिकृत आदेश आले असल्याची माहिती आहे.
लई धुतल्या तांदुळासारखं आयुष्य जगलोय..सुरेश धसांचं वाल्मिक कराडच्या पत्नीला उत्तर
असे असेल एसआयटीचं पथक
– आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली – पोलीस उपमहानिरीक्षक
– अनिल गुजर – पो. उप अधीक्षक
– विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक
– महेश विघ्ने – पो.उ.निरीक्षक
– आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक
– तुळशीराम जगताप – सहा. पो. उ. निरीक्षक
– मनोज राजेंद्र वाघ – पोलीस हवालदार
– चंद्रकांत एस.काळकुटे – पोलीस नाईक
– बाळासाहेब देविदास अहंकारे – पोलीस नाईक
– संतोष भगवानराव गित्ते – पोलीस शिपाई