Download App

Beed Crime : शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाला जातीय रंग देऊ नका; SP कॉवत यांचे आवाहन

परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तात्कालीक कारणातून झाली. या घटनेला जातीय रंग देऊ नका - पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत

Navneet Kanvat On Beed Crime : परळीत (Parli) एका टोळक्याने शिवराज हनुमान दिवटे (Shivaraj Hanuman Divate) या युवकाचं अपहरण करून त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या मारहाणीला जातीय रंग न देण्याचे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉव (Navneet Kanvat) यांनी केलं आहे. तसेच हे सगळे आरोपी वेगवेगळ्या समाजाचे असल्याचंही पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

एका दिग्दर्शकाने मला ब्लाउज काढण्यासाठी.. बॉलिवूड धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा ‘तो’ प्रसंग काय? 

परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तात्कालीक कारणातून झाल्याचंही अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगिलतं.

पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत म्हणाले, १६ मे रोजी परळी येथील शिवराज दिवटे नावाचा तरुण सकाळी साडेअकरा वाजताच्या त्याच्या मित्रासोबत जलालपूर येथे एका कार्यक्रमाला गेला होता. जेवत करत असताना काही अनोळखी व्यक्तींसोबत त्याचे किरकोळ भांडण झाले होते. या भांडणाची कोणताही तक्रार दाखल झालेली नाही. त्यानंतर गावात परत निघालेल्या शिवराज दिवटेला काही ओळखीच्या आणि काही अनोळखी तरुणांनी पेट्रोल पंपाजवळील जगदीश्वर डोंगरावरून खाली उतरवले. नंतर त्या तरुणाला तिथेच बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओही सोशल व्हायरल झाला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच फिर्यादीचा जबाब घेतला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही सात आरोपींना अटक केली. त्यापैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक कॉवत यांनी दिली.

… अन् राज्यात महिला आरक्षण बिल पास; अजित पवारांनी सांगितला शरद पवारांचा ‘तो’ किस्सा 

हे प्रकरण तात्कालीन असून यामागे जातीय कारण नाही. अटक केलेल्या आरोपींमध्ये वेगवेगळ्या समुदायातील मुलांचा समावेश आहे. दरम्यान, प्रकरण गंभीर आहे. आम्ही आरोपींवर कठोर आणि गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. यात सखोल तपास होईल, असं आश्वासन कॉवत यांनी दिलं.

दमानिया काय म्हणाल्या?
अंजली दमानिया म्हणाल्या की, बीडचं परळी म्हणजे आता दहशतीचा अड्डा झालंय. या प्रकाराला अतिशय गांभीर्याने घ्यायला हवे. काल जो मारहाणीचा प्रकार घडला त्यातील सर्व मुलं ही अल्पवयीन होती. या सगळ्या मुलांची मारहाण पाहून दुसऱ्या एका व्हिडिओत ज्याला मारलं, त्याला ज्या पद्धतीने पाया पडायला लावलं होतं. ते पाहून असं वाटतं की ही एख रिव्हेंज केस होती. या सगळ्या गोष्टी आता भलत्याच दिशेने जात आहेत. जसं आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केलं होतं तसंच आता बीडमध्ये करण्याची गरज आहे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

नेमका वाद काय?
परळीतील जलालपूर येथे एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग मनात धरुन दहा ते बारा जणांच्या टोळक्याने परळीत काल रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शिवराज हनुमान दिवटे या तरुणाला उचलले. नंतर त्याला गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन आले. येथे त्याला लाठ्याकाठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मारहाण करणाऱ्या माथेफिरुंना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

follow us