Pankaja Munde : परळीत शासन आपल्या दारी (shasan aplya dari)कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde )यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, कार्यक्रमाच्या स्टेजकडे पाहून गर्मी उकाडा वाढला कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)हे एकाच मंचावर आले आहेत, असं म्हणत राजकीय टोलेबाजी केली. त्याचवेळी गर्मीचा पारा जास्त वाढला आहे, कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही एकाच मंचावर आहेत, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चौफेर टोलेबाजी केली.
Chandrayan 3 चा परतीचा प्रवास सुरू; ‘या’ कामासाठी परत येणार प्रोपल्शन मॉड्युल
परळीमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषीमंत्री धनंजय मुंडेंसह भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Loan Write Off : बँकांनी 5 वर्षांत 10 लाख कोटींच्या कर्जावर सोडलं पाणी; उद्योजकांचा वाटा सर्वाधिक
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, परळीच्या विकासासाठी आपली कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी आहे. बीडची एक कन्या म्हणून या मंचावर आले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी खासदार प्रितम मुंडे या ठिकाणी नसल्याने आपण या मंचावर आल्याचेही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.
राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आली आहे. त्या राज्यांमधील शासकीय योजना आहेत जशी की, मध्यप्रदेशमधील लाडली बहना योजना आणि त्या ठिकाणच्या ओबीसींच्या आरक्षणाचा विषय जसा त्यांनी मार्गी लावला, तसे आपल्या राज्यातील विषय मार्गी लावले तर आपल्याला शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्याची गरज नाही, दारात येऊन आपल्याला आशिर्वाद देतील, आपल्याला पुन्हा संधी देतील असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
माझ्या राजकीय जिवनामध्ये पालकमंत्री असताना कोणाची जात पाहिली नाही, कोणाचा धर्म पाहिला नाही. कोणाचा पक्ष पाहिला नाही. दुसऱ्या पक्षाच्या लोकांनाही कधी त्रास दिला नाही. कधीही त्यांच्याबद्दल द्वेष मनामध्ये ठेवला नाही. कारण या जिल्ह्याच्या लोकांचं कर्ज आमच्या डोक्यावर आहे. जिल्ह्यातील लोकांचा कायम आमच्यावर आशिर्वाद आहे.