Download App

सरपंच देशमुखांच्या हत्येसाठी कोणते सात शस्त्रे वापरले ? अधिकाऱ्यांची न्यायालयात महत्त्वाची माहिती, आरोपींची पोलिस कोठडी वाढली

Beed Sarpanch Santosh Deshmukh यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी सात शस्त्र वापरले होते. त्याची माहिती तपासी अधिकाऱ्याने दिली.

  • Written By: Last Updated:

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या हत्याप्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक झालेली आहे. तर एक आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) हा फरार आहे. या हत्येच्या गुन्ह्यात सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटेला (Vishnu Chate) अटक झाली होती. त्यात त्याची पोलिस कोठडी संपली आहे. त्याला खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. त्याला या गुन्ह्यात दहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सुरेश धस आणि वाल्मिक कराड दोघांचीही चौकशी झाली पाहिजे…; एकनाथ खडसेंची मागणी

सरपंच हत्या प्रकरणात विष्णू चाटेला, जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदार या चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातील विष्णू चाटेची पोलिस कोठडी संपलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या तीन आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदार यांना सीआयडी पोलीस कोठडी आहे. या तिन्ही आरोपांना 12 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिस कोठडी मागविताना तपासी अधिकारी यांनी महत्त्वाची माहिती न्यायालयात दिली आहे.

‘मोफत शिक्षण द्यायचे असेल तर तुमच्या शिक्षण संस्थातून द्या, भरमसाठ डोनेशन का घेता?’, कॉंग्रेसचा विखेंना सवाल

देशमुख यांची हत्या कुठल्या शस्त्राने केली हे तपासी अधिकारी यांनी न्यायालयात सांगितले आहे. देशमुख यांचे वाहनातून अपहरण केले होते. त्यावेळी देशमुख यांना मारहाण करताना 41 इंचाचा एक गॅसचा पाईप वापरला. आरोपींना हा पाईप हातात धरण्यासाठी एका बाजूला काळ्या करदोड्याची मूठ तयार केली होती. तर लोखंडी तारेचे पाच क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ होती. एक लाकडी दांडा, तलवारीसारखे शस्त्र, चार लोखंडी रॉड आणि एक कोयता, लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती असे शस्त्र वापरले आहे. हे शस्त्र त्यांच्याकडून हस्तगत करायचे असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले आहे.

संतोष देशमुख हत्या ठरवून केली

पोलिसांच्या तपासावरून आरोपींना संतोष देशमुख यांची हत्या करायची होती. त्यासाठी त्यांनी तयार केली होती. त्यासाठी हे शस्त्र वापरले गेल्याचे यावरून दिसून येत आहे.

follow us