संतोष देशमुखांचा खून केल्यानंतर सुदर्शन घुलेने गाठली भिवंडी…पुढं काय घडलं? कशामुळं प्लॅन फसला

संतोष देशमुखांचा खून केल्यानंतर सुदर्शन घुलेने गाठली भिवंडी…पुढं काय घडलं? कशामुळं प्लॅन फसला

Sudarshan Ghule : संतोष देशमुख हत्येतील आरोपींचे भिवंडी कनेक्शन समोर आलं आहे. (Sudarshan Ghule) या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले त्याच्या इतर दोन साथीदारांसह तिघंही हत्याकांडानंतर (दि. 11 डिसेंबर) रोजी भिवंडीत आपल्या ओळखीच्या मित्राकडे राहायला आला होता. मात्र, भिवंडीत आसरा मिळाला नसल्याने त्याच दिवशी तिघेही आरोपी भिवंडीतून गुजरातला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेंसह तिघांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी

सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या केल्यानंतर तिन्ही मुख्य आरोपी ११ डिसेंबर रोजी भिवंडीतील समाजसेवक सोन्या पाटील यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर आरोपींनी बीड येथील त्यांच्या गावशेजारील व ओळखीचे भिवंडीत राहणारे विक्रम डोईफोडे यांची ओळख सांगितली. त्यांनतर सोन्या पाटील यांच्या कार्यालयात सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटीलने विक्रम डोईफोडे यांना आरोपी सुदर्शन घुले याचा फोटो विक्रम डोईफोडे यांना पाठवला. मात्र, विक्रम डोईफोडे हे वैष्णो देवी येथे देवदर्शनाला गेले होते. फोटो पाहून त्यांनी आरोपी सुदर्शन घुले यांना ओळखल्यानंतर देशमुख हत्येमध्ये त्यांचा समावेश असल्याचे बातम्या व समाज माध्यमांद्वारे समजले असल्याने विक्रम डोईफोडे यांनी त्यांना आसरा देण्यास नकार दिला.

यानंतर तिन्ही आरोपींनी त्यांच्या गावातील ओळखीचा तरुण रवी बारगजे याचा तपास काढला. रवी हा भिवंडीतील वळपाडा येथील विक्रम डोईफोडे यांच्याच बार आणि रेस्टाँरंटमध्ये काम करत असल्याने रवी यानेही विक्रम डोईफोडे यांना कॉल करून तीनही आरोपी बारवर आले असल्याची माहिती दिली. मात्र, विक्रम यांनी त्यांना राहण्यास देऊ नका असे सांगितल्याने तीनही आरोपी लघुशंकेचे नाव सांगून थेट तेथून पळून गेल्याची माहिती विक्रम डोईफोडे यांनी दिली आहे.

भिवंडीत नेमकं काय घडलं?

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर प्रमुख आरोपी सुदर्शन घुले भिवंडीत लपण्यासाठी आल्यानंतर त्यांनी सामाजिक संस्था चालवणारे सोन्या पाटील यांचे कार्यालय गाठले. त्यानंतर त्या कार्यालयावर सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटील यांना प्रथम भेटले व त्यानंतर त्यांनी त्यांच्या गावाच्या शेजारी राहणारे विक्रम डोईफोडे बारचे मालक आहेत यांच्याबद्दल विचारणा केली. कारण सुदर्शन घुले यांना माहीत होते की सोन्या पाटील यांच्या संस्थेत विक्रम डोईफोडे काम करतात.

सुदर्शन घुले याच्या गावचा मुलगा रवि बारगजे विक्रम डोईफोडे कडे काम करतो. त्यामुळे त्यांनी सोन्या पाटील यांच्या कार्यालयावर चौकशी केली. परंतु सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटील यांनी ही माहिती विक्रम डोईफोडे यांना दिली आणि त्यानंतर डोईफोडे यांचा पत्ता मिळाल्यानंतर सुदर्शन घुले व त्यांचे साथीदार वळपाडा येथील बार वर पोहोचले व एक-दोन दिवस लपण्यासाठी मदत मागितली. परंतु त्या ठिकाणी विक्रम डोईफोडे हे बाहेर होते आणि कामगारांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांना स्पष्ट मनाई केली त्यानंतर हे तिन्ही आरोपी तेथून निघून गेले.

सुदर्शन घुलेचा प्लॅन फसला

सोन्या पाटील सामाजिक काम करत असून ते समाज कल्याण न्यासचे संस्थापक आहेत. त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक कामं केली आहेत. त्यांच्याकडे विक्रम डोईफोडे हे संस्थेत सचिव म्हणून काम करतात. विक्रम यांचे गाव डोईफोडवाडी असून मस्साजोग पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सुदर्शन घुले हा विक्रम डोईफोडे यांना ओळखत होता. तसेच सुदर्शन घुले याच्या गावातील मुलगा रवी हा विक्रम डोईफोडे कडे काम करत होता हे सुदर्शन गुलेला माहीत होते.

सुदर्शन घुले कडे कोणाचेही संपर्क नंबर नसल्याने त्यांनी सर्वप्रथम भिवंडीत दाखल झाल्यानंतर समाज कल्याण न्यासचे कार्यालय गाठले. परंतु समाज कल्याण न्यासचे संस्थापक सोन्या पाटील तिथे नव्हते. त्या ठिकाणी त्यांचे बंधू जयवंत पाटील त्यांना भेटले व त्यांनी विक्रम डोईफोडे यांचा पत्ता दिला व ही माहिती विक्रम डोईफोडे यांना देखील दिली. त्यानंतर सुदर्शन घुले हा विक्रम डोईफोडे यांचे बिअर शॉपवर पोहोचले आणि बिअर शॉपचे मालक विक्रम डोईफोडे यांनी त्यांना मदत करण्यास नकार दिला त्यानंतर ते त्यातून निघून गेले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube