भिवंडीत फोटोचा वाद उफाळला; भाजपच्या माजी मंत्र्याने केली कथोरेंच्या हकालपट्टीची मागणी

भिवंडीत फोटोचा वाद उफाळला; भाजपच्या माजी मंत्र्याने केली कथोरेंच्या हकालपट्टीची मागणी

Bhiwandi Lok Sabha : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपअंतर्गत वाद अजूनही (Bhiwandi Lok Sabha) थांबलेला नाही. येथील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी चार जूननंतर करेक्ट कार्यक्रम होणार असे म्हणत हा वाद चव्हाट्यावर आणला होता. मात्र तरीही पक्षश्रेष्ठींनी या वादाची दखल घेतली नसल्याचे नुक्त्याच घडलेल्या एका प्रकारावरून समोर आले आहे. माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी कपिल पाटील यांच्याविरोधात काम करणाऱ्या किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

यामागे कारणही तसंच आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांच्याबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे माजी मंत्री पाटील यांनी भाजप नेत्यांना पत्र पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार कथोरे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघातील आगरी भागात बाळ्यामामा म्हात्रे यांना तर कुणबी भागात अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना मतदान करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली होती. या संदर्भात सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल होत आहेत तोच कथोरेंनी कपिल पाटील यांच्या विरोधात काम केल्याचा पुरावा आहे, असा आरोप करत कथोरेंची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.

भाजपतील वाद उफाळला! ४ जूननंतर करेक्ट कार्यक्रम; कपिल पाटलांच्या निशाण्यावर कथोरे का आले?

चार ते पाच महिन्यांपूर्वी सागर बंगल्यावर एक बैठक झाली होती. या बैठकीला रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, कपिल पाटील आणि मी उपस्थित होतो. त्यावेळी कपिल पाटील यांनी स्पष्टपणे आपत्ती व्यक्त केली होती. परंतु, कथोरेंनी त्यावर काहीच खुलासा केला नाही. पण मी नाराजी व्यक्त केली होती.

किसन कथोरे यांनी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना सांगितले की ज्या ठिकाणी आगरी समाजाची गावं आहेत तेथे बाळ्यामामा म्हात्रेंची निशाणी तुतारीला तर कुणबी समाजाची गावं आहेत तिथे निलेश सांबरे यांच्या शिलाई मशीनला मतदान करा अशा सूचना केल्या. कथोरेंच्या या वर्तणुकीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे आता कथोरेंची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी पत्रातून केली आहे.

भिवंडीमध्ये पवारांकडून बाळ्यामामांना उमेदवारी… साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाणांचा मार्ग मोकळा?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube