Bajrang Sonawane : सर्व काही उद्ध्वस्त, शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; खासदार सोनवणेंची मागणी
Bajrang Sonawane : शेतकऱ्यांचं सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. पिके तर गेलेच आहेत, मात्र त्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्या आहेत.

Bajrang Sonawane : शेतकऱ्यांचं सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. पिके तर गेलेच आहेत, मात्र त्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. खासदार सोनवणे बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यांनी गेवराई तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर, माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे.
यावेळी त्यांनी गावात रस्ता नसल्याने थर्माकोलच्या चप्पूवर बसून पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी खासदार सोनवणे (Bajrang Sonawane ) म्हणाले की, बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलेला आहे. जायकवाडी धरणातून बीड (BEED) जिल्ह्यातील माजलगाव धरणाला पाणी सोडले आहे. गोदावरी नदीच्या बाहेर तीन किलोमीटर पर्यंत पाणी आहे. या पाण्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, परळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मराठा समाजाला कुणबी दाखले द्या पण वेगळा प्रवर्ग करा; गोपीचंद पडळकारांची वादात उडी
जिल्ह्यातील दहा ते बारा गाव असे आहेत की त्यांचा संपूर्ण संपर्क तुटला आहे. गावच्या गाव उध्वस्त झाले आहेत. त्यामुळं ज्या लोकांच्या शेतीचे, घराचे नुकसान झाले आहेत, त्यांना तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या. ज्या लोकांची शेत वाहून गेले आहे, गोटे गेले आहेत, त्यांना वेगळ अनुदान द्या, पूरग्रस्त भागातील लोकांचे पुनर्वसन करा, अशी मागणी यावेळी खासदरा बजरंग सोनवणे यांनी केली आहे.