Download App

‘संविधाना’ची विटंबना दुर्देवी, निषेधार्ह पण कायदा सुव्यवस्था राखा; गिरीश महाजनांचं आवाहन…

परभणीत संविधानाची विटंबना झालीयं, हे दुर्देवी असून निषेधार्ह आहे पण कायदा सुव्यवस्था राखण्याची आपली जबाबदारी असल्याचं आवाहन भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी केलंय.

Girish Mahajan : परभणीत संविधानाची विटंबना झालीयं, हे दुर्देवी असून निषेधार्ह आहे पण कायदा सुव्यवस्था राखण्याची आपली जबाबदारी असल्याचं आवाहन भाजपचे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलंय. परभणीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडलीयं. या घटनेनंतर परभणीत हिंसाचार उफाळल्याचं दिसून आलंय. त्यावर बोलताना महाजनांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय.

गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले, परभणीमध्ये एका माथेफिरुने पवित्र संविधानाची विटंबना केली हे दुर्देव असून निषेधार्ह आहे. हा इसम मानसिकदृष्ट्या विकलांग असून त्याला पोलिसांनी अटक केलीयं. संविधान आपल्या सर्वांसाठी सर्वोच्च असून आपल्याला आदर आहे. कुठल्याही प्रकारचा कायदा हाती घेत सामाजिक सलोखा बिघडेल असं कृत्य कोणीही करु नये, असं आवाहन गिरीश महाजनांनी केलंय.

फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला; दिल्लीतूनच तोडगा निघणार?

तसेच सरकारी मालमत्तेच नूकसान होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं या प्रकरणाकडे लक्ष असून ते सातत्याने पोलिस प्रशासनाच्या संपर्कात आहेत. नागरिकांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं, असंही गिरीश महाजन म्हणाले आहेत.

परभणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार काल घडलायं. या घटनेच्या परभणीतील आंबेडकरी अनुयायांकडून संताप व्यक्त केला जात असून निषेध व्यक्त करण्यासाठी अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून परभणी बंदची घोषणा देण्यात आली असून ठिक-ठिकाणी टायर जाळून निषेध केला जात आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अनुयायांना कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबतचं आवाहन केलंय. यासंदर्भातील ट्विट त्यांनी केलंय.

follow us