Download App

अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी; कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा

राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Abdul Sattar : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी होत आहे. ही मागणी सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी केलीये. (BJP) त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत सत्तार यांनी महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप कमलेश कटारिया यांनी केलाय. तसंच, सत्तार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. (Abdul Sattar) त्यामुळे त्यांनी युती विरोधी काम केलं असून त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी करणार पत्र भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलं आहे.

काळे माझे चांगले मित्र   हिशोब पूर्ण, दानवे पडले, आता त्यांच्याच साक्षीनं टोपी काढणार सत्तारांनी ठरलेलंच सांगितलं

जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस नेते डॉ. कल्याण काळे यांनी त्यांचा पराभव केला आहे. काळेंच्या विजयात अनेक अदृश हातांची मदत झाल्याचं बोलले जात आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे राज्यातील अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचं नाव घेतलं जात आहे. अब्दुल सत्तार यांची आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी त्यांच्या सिल्लोड येथील संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली. तेव्हा सत्तार यांनी काळेंचे अभिनंदन करत डोक्यावर हात ठेवला होता. एवढेच नाही तर काळे माझे चांगले मित्र आहेत, त्यांना मी निवडणुकीत मदत केल्याची जाहीर कबुलीही सत्तार यांनी दिली होती. या घटनेनंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेत सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

पुन्हा काँग्रेसमध्ये ?

लोकसभा निवडणुकीनंतर अब्दुल सत्तार आणि काँग्रेसच्या नेत्यांमधील जवळीक वाली आहे. काँग्रेसचे जालन्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी नुकतीच अब्दुल सत्तार यांची त्यांच्या सिल्लोड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली होती. भोकरदन शहराला खडकपूर्णा योजनेतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी या भेटीत सत्तारांकडे केली. त्यांनी ही मागणी मान्य करुन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळं सत्तार पुन्हा काँग्रेसची वाट धरणार का? असा सवालही यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे.

follow us

वेब स्टोरीज