एमआयडीसीत एक उद्योग आणून दाखवा, धनंजय मुंडेंचे पंकजा मुंडेंना चॅंलेज

परळी : परळी विधानसभा मतदारसंघात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावरून मुंडे बहीण भाऊ शाब्दिक युद्ध रंगले आहे. परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे जलजीवन मिश्रांतर्गत कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुंडे बहिणींवर टीका केली आहे. परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगा वरून खासदार प्रीतम मुंडे […]

142

142

परळी : परळी विधानसभा मतदारसंघात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावरून मुंडे बहीण भाऊ शाब्दिक युद्ध रंगले आहे. परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे जलजीवन मिश्रांतर्गत कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळी धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुंडे बहिणींवर टीका केली आहे. परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगा वरून खासदार प्रीतम मुंडे यांना टोला लगावला. काशी विश्वनाथाचं जेवढं महत्त्व आहे तेवढेच महत्त्व परळीच्या प्रभु वैद्यनाथाचे देखील आहे. खासदारांना हे माहित हवं होतं. तर शिरसाळा येथील एमआयडीसी वरून बहिण पंकजांवर देखील धनंजय मुंडे यांनी टीका केली.

मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

मी आणलेल्या एमआयडीसीत एक उद्योग आणून दाखवा, मी स्वतः रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत करेल. असं आवाहन धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे दिले आहे. 2009 ची विधानसभा निवडणुक मला लढवून दिली असती तर आज मतदारसंघ पंधरा वर्षे पुढे विकासात गेला असता असे देखील धनंजय मुंडे म्हणले.

Exit mobile version