Download App

बारावीचा गणिताचाही पेपर फुटला: आर्धा तास आधीच पेपर व्हायरल

बुलढाणा : शिक्षण मंडळाच्या खबरदारीनंतरही पहिल्याच दिवसापासून बारावीचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर येत आहेत. आज बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजामध्ये (Sindkhed Raja) बारावीचा गणिताचा पेपर (HSC Maths Paper Leak) सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच फुटला आहे. प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

बोर्डाने मात्र पेपरफुटीला अधिकृत दुजोरा दिला नाही. पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोर्ड अधिकृतरित्या माहिती देणार आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेतही चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

Sydney Opera House : काय आहे सिडनी ॲापेरा ? प्रविण तरडेंनी थेट ॲास्ट्रेलियातून सांगितले…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता. अजित पवार म्हणाले की, “सिंदखेडचा राजा या ठिकाणी बारावीचा पेपर फुटला आहे. अभ्यास करणाऱ्यां विद्यार्थ्यांचं मोठ नुकसान झाले आहे. यावर सरकार काय उपाय करणार? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. अजित पवारांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या प्रकरणी संध्याकाळपर्यंत चौकशी करु अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलीय आहे.

यापूर्वी परभणी जिल्ह्याच्या सोनपेठमध्ये चक्क परीक्षा केंद्र असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनीच इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत असल्याचा धक्कादायक प्रकार सोनपेठ पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.

Tags

follow us