Eknath Shinde : आज मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर; जाणून घ्या, संपूर्ण दौरा

औरंगाबाद : दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या 56 व्या प्रांतीय निरंकारी संत समागम सोहळ्याचं (56th Provincial Nirankari Sant Samagam)आयोजन औरंगाबादच्या (Aurangabad) बिडकीन डीएमआयसीमध्ये (DMIC) करण्यात आलंय. औरंगाबादमध्ये प्रथमच 27 ते 29 जानेवारीदरम्यान आध्यात्मिक सोहळा होत असून, त्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत, एक तास मुख्यमंत्री समागम सोहळ्याला […]

राखी सावंतच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

राखी सावंतच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

औरंगाबाद : दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या 56 व्या प्रांतीय निरंकारी संत समागम सोहळ्याचं (56th Provincial Nirankari Sant Samagam)आयोजन औरंगाबादच्या (Aurangabad) बिडकीन डीएमआयसीमध्ये (DMIC) करण्यात आलंय. औरंगाबादमध्ये प्रथमच 27 ते 29 जानेवारीदरम्यान आध्यात्मिक सोहळा होत असून, त्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत, एक तास मुख्यमंत्री समागम सोहळ्याला देणार असून, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पुण्याला रवाना होणार आहेत.
YouTube video player
*जाणून घ्या मुख्यमंत्र्यांचा दौरा*
– दुपारी 12 वाजता : वर्षा शासकीय निवासस्थान मुंबई येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडं प्रयाण
– दुपारी 12:30 वाजता : मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने औरंगाबादकडे प्रयाण
– दुपारी 1:30 वाजता : औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने बिडकीन औरंगाबादकडे प्रयाण
– दुपारी 02 ते 03 वाजेपर्यंत: निरंकारी संत समागम कार्यक्रमास उपस्थिती व राखीव (बिडकीन डीएमआयसी पैठण औरंगाबाद)
– दुपारी 03 वाजता : डीएमआयसी बिडकीन येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे रवाना
– दुपारी 03:30 वाजता : औरंगाबाद विमानतळ येथून शासकीय विमानाने पुणे विमानतळकडे रवाना
– सायंकाळी 04:30 वाजता : पुणे विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण
– सायंकाळी 04:45 वाजता : शासकीय विश्रामगृह पुणे येथे आगमन व राखीव
– सायंकाळी 05:45 वाजता : 16 वी भीमथडी जत्रा व प्रदर्शनास उपस्थिती (कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे)
– सायंकाळी 06:30 वाजता : कृषी महाविद्यालय शिवाजीनगर येथून मोटारीने श्री क्षेत्र भंडारा डोंगर (ता.मावळ जिल्हा पुणे) येथे प्रयाण
– सायंकाळी 07:00 वाजता : श्री संत तुकाराम महाराज मंदिर व माघ दशमी सोहळ्यास उपस्थिती (श्री क्षेत्र भंडारा डोंगर ता.मावळ जिल्हा पुणे)
– सायंकाळी 07:30 वाजता : भंडारा डोंगर येथून मोटारीने पुणे विमानतळाकडे प्रयाण
– रात्री 08:00 वाजता : पुणे विमानतळ येथे आगमन व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण
– रात्री 08:45 वाजता : मुंबई विमानतळ येथे आगमन व तेथून मोटारीने मालाडकडे प्रयाण
– रात्री 09:15 वाजता : कलावंती आई संप्रदायाचे खासदार निधीतून बांधलेले योगालयाचे उद्घाटन
– रात्री 10:00 वाजता : मालाड येथून मोटारीने वर्षा निवासस्थानाकडे प्रयाण
– रात्री 10:45 वाजता : वर्षा निवासस्थान येथे आगमन व राखीव

Exit mobile version