Aurangabad, Osmanabad : शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मनाबाद (Osmanabad ) शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्यानुसार औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मनाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं आहे. मात्र केंद्र सरकारकडूनही या निर्णयला मंजुरी मिळाली होती. पण, आता त्यानंतर नामांतराच्या बदलाला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
Rajkumar Rao च्या ‘स्त्री ते बधाई दो’ तील खास भूमिका; वाढदिसानिमित्त जाणून घेऊ प्रवास
जिल्ह्याचे मूळ नाव कायम राहणार…
औरंगाबाद आणि उस्मनाबाद जिल्ह्यांच्या नामांतराच्या (City Renaming) बदलाला आव्हान देण्यात आलेल्या याचिका निकाली काढताना मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले की, औरंगाबाद आणि उस्मनाबाद जिल्ह्यांचे नावं त्याचबरोबर महसुल विभागाचे नाव कायम राहणार आहेत. तर राज्य सरकारने या दोन्ही जिल्ह्यांच्या व महसूल विभागाच्या नामांतराची अंतिम अधिसूचना काढली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने ही याचिका निकाली काढताना जिल्ह्याचे मूळ नाव कायम राहणार अलसल्याचा निर्णय दिला.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीवर काळाचा घाला; टायर फुटून गाडी खडकवासला धरणात बुडाली
शहरांच्या नामांतरावर निर्णय येणे बाकी…
तसेच या शहरांच्या नामांतराला (City Renaming) आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निर्णय येणे बाकी आहे. त्यावर अंतिम सुनावणी ही 4 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे आता या शहरांच्या नामांतरांवर काय निर्णय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.