Download App

मानपानावरून वर पक्ष – वधू पक्षात जोरदार हाणामारी, १०-१२ जण हॉस्पिटलमध्ये भरती, पैठणमधील घटना

  • Written By: Last Updated:

Clash at wedding, 10 to 12 people Admit in hospital : लग्न सोहळा ( wedding ceremony ) म्हटलं की, अनेक गोष्टी आल्या. यामध्ये मुलीची बाजू असेल तर पाहुण्यांचा वेगळाच थाट सहन करावा लागतो. पाहुण्यांचे रुसवे-फुगवे पाहायला मिळतात. ऐन लग्नात मानपानावरून वाद होतात. मानपान केला नाही म्हणून सुरू झालेला वाद अनेकदा मारहाणीपर्यंत जातो. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमधील ( Chhatrapati Sambhajinagar ) एका गावात घडली. मानपानावरून वर पक्ष आणि वधू कडील पक्ष यांच्यात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्हीकडचे अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळं या मंडळींना मंडपातून थेट हॉस्पीटलमध्ये भरती करावं लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील थापटी तांडा या गावात एक लग्न समारंभ होता. या लग्नाला पुण्याहून वऱ्हाड आलं होतं. या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होती. ठरल्याप्रमाणे शनिावारी लग्न सोहळा पार पडला. मात्र, यावेळी वधू पक्ष आणि वर पक्षात मानापानावरून वाद सुरू झाला. सुरूवातीला हा वाद किरकोळ होता. पण नंतर या वादाचं रुपांतर राड्यात झालं. दोन्ही बाजूचे तरूण एकमेकांना भिडले आणि एकमेकांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली.

आपण नेमकं लोकशाहीत राहत आहोत का?; बारसू रिफायनरीवरुन आव्हाडांचा संताप

लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुण्याहून आलेल्या वऱ्हाडातील काही पाहुण्या लोकांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळं हा वाद चांगलाच चिघळला. हा वाद इतका विकोपाला गेला की, लग्न मंडपाला चक्क युध्दाच्या छापणीचं रुप आलं. कारण, शाब्दिक बाचाबाची थेट मारामारीपर्यंत गेली होती.

दोन्ही गटातील तरूण एकमेकांवर हल्ला चढवत होते. यात महिलांना मारहाण करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांकडून वाद वाढला. यात दोन्ही बाजुचे १० ते १२ जण गंभीर जखमी झाले. जखमींना पाचोडच्या घाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. तर किरकोळ जखमींना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे, दोन्हीकडच्या मंडळींनी या राड्याची पोलिसांत तक्रार केली नाही.

Tags

follow us