अशोक चव्हाणांनी गड राखला; भोकर बाजार समितीत काँग्रेसची सत्ता कायम

APMC Election Result : नांदेड जिल्ह्यातील चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज तीन बाजार समितीची मतमोजणी होत असून काही निकाल हाती आले आहे. हाती आलेल्या निकालानुसार भोकर बाजार समितीत काँग्रेसने बाजी मारत सत्ता कायम ठेवली आहे. या निवडणुकीवर स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लक्ष ठेवून होते. चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली […]

Untitled Design   2023 04 29T162553.535

Untitled Design 2023 04 29T162553.535

APMC Election Result : नांदेड जिल्ह्यातील चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज तीन बाजार समितीची मतमोजणी होत असून काही निकाल हाती आले आहे. हाती आलेल्या निकालानुसार भोकर बाजार समितीत काँग्रेसने बाजी मारत सत्ता कायम ठेवली आहे. या निवडणुकीवर स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लक्ष ठेवून होते. चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात महाविकास आघाडीने चांगले यश संपादन केले आहे.

महत्वाची बातमी! मे महिन्यात कसे असणार तापमान? पाहा हवामान विभागाचा अंदाज

हिमायतनगर बाजार समितीमध्ये काँग्रेसने निर्विवाद यश संपादन केले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या पॅनलचा काँग्रेसने दारुण पराभव केला तर भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 15 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. यामध्ये काँग्रेस 13 तर 2 जागांवर राष्ट्रवादी विजयी झाले आहे. निवडणुकीत खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना जोरदार धक्का बसला आहे. निवडणुकीचे कौल पाहता जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची विजयाकडे घोडदौड सुरू आहे.

रिफायनरीसाठी लोकांचे टाळके फोडणे योग्य नाही… पटोलेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

तत्पूर्वी हिमायतनगर येथील निवडणूक विद्यमान आमदार माधवराव जवळगावकर आणि माजी आमदार नागेश अष्टीकर यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. परंतु मतदारांनी जवळगावकर यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या पॅनलला भरभरून प्रतिसाद देत 18 पैकी 18 उमेदवार विजयी केले आहेत.

Exit mobile version