छ. संभाजीनगर : मागील अडीच वर्षात माशा मारत होता का? असा थेट प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआतील नेत्यांना केला आहे. याआधी संभाजीनगरमध्ये घेतली होती. त्यातील जवळपास सगळे निर्णय इंप्लीमेंट झाले असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. ते छ. संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
मोठी बातमी! आता ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशिव’ जिल्हा; शहरांनंतर जिल्ह्यांचेही नामकरण
फडणवीस म्हणाले की, मागील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांपैकी एखाद दुसरा निर्णय इंप्लीमेंट स्टेजला आहे. कारण त्यात काही अडचणी आहेत. मात्र, बाकी सर्व निर्णया इंप्लीमेंट झाले आहेत. काही लोक मागच्या बैठकीत काय झालं असा प्रश्न उपस्थित करत आहेत. त्या सर्वांनी माझा एक प्रश्न आहे की, त्यांनी मागी अडीच वर्षात मराठवाड्यासाठी काय केले? तुम्ही सरकारमध्ये होते. एखादा निर्णय मागे राहिला असेल तर, तो पूर्ण करण्याची जाबाबदारी तुमची होती असे म्हणत तुम्ही अडीच वर्ष माशा मारत होतात का? असा थेट प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला.
हिंदी भाषेवरून Prakash Raj यांची अमित शाहांवर जोरदार टीका; यावर कंगनाने थेट म्हणाली…
मराठावाडा वॉटर ग्रीडचा मुडदा पाडण्याचे काम ज्या सरकारने केले तेच लोक माराठवाड्याला काल दिले असा प्रश्न विचारत आहेत. जे दिले होते त्याचा मुडदा पाडण्याचे काम यांनी केले. यांना मराठवाड्याशी काही देणे घेणे नसून यांना केवळ राजकारण करायचे आहे. मराठवाड्याच्या हिताची बैठक होणार असेल तर, ती कशी हाणून पाडायची कसे निर्णय होणार नाहीत, कसा मराठवाडा मागे राहिल अशा प्रकारचा यांचा कावा असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.
फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी घोषणांची बरसात केली. आता बेकायदेशीर मुख्यमंत्री श्रीमान मिंधे तेच करतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2016 मध्ये त्यांनी संभाजीनगरात मंत्रिमंडळात बैठक घेऊन साधारण 50 हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांचं काय झालं, असा सवाल ठाकरे गटाने केला होता. त्यावर फडणवीसांना मागील बैठकीतील सर्व निर्णयांची अंमलबजावणी केल्याचा दावा केला आहे. तसेच एखादा निर्णय मागे राहिला असेल तर, तुम्ही सत्तेत होता. त्यावेळी तुम्ही त्यावर काम करण्याऐवजी माशा मारत होता का? असा प्रश्न विचारला आहे. फडणवीसांच्या या टीकेमुळे विरोधकांकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
🕚 11.08am | 16-9-2023📍Chhatrapati SambhajiNagar | स. ११.०८ वा. | १६-९-२०२३ 📍छत्रपती संभाजीनगर.
LIVE | Media interaction.#Chhatrapati_SambhajiNagar #Maharashtra https://t.co/0zrUeHEdVr
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 16, 2023