Download App

Dhananjay Munde : काय ते स्वागत, 101 जेसीबी अन् 10 टन फुलं!

बीड : राष्ट्रवादीचे (NCP)आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला 39 दिवसांपूर्वी परळीत (Parali)अपघात झाला होता. या अपघातानंतर मुंडे यांच्यावर मुंबईत (Mumbai)उपचार झाले. त्यांच्या स्वागताचा सोहळा पाहून सर्वच आवाक् झाले, त्याचबरोबर या स्वागताचं स्वतः धनंजय मुंडे यांनी तोंडभरून कौतुक केलंय.

धनंजय मुंडे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी तब्बल 101 जेसीबी होत्या. त्या जेसीबींमधून 10 टन फुलांची वृष्टी करण्यात आली. हा संपूर्ण डामडौल पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. सर्वत्र या स्वागताची चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतंय.

सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन स्व. गोपीनाथराव मुंडे यांना वंदन केलं. त्यानंतर गोपीनाथगड ते परळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. डीजे, विद्युत रोषणाई अन् कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. या ठिकाणाई विशेष म्हणजे संसदेची प्रतिकृती स्वागतासाठी लावली होती.

Sharad Pawar : सरकारकडून सत्तेचा गैरवापर, संधी आल्यावर जागा दाखवा

धनंजय मुंडे मुंबईहून थेट गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी पोहचले. तिथं समर्थकांकडून मोठ्या डामडौलामध्ये स्वागत करण्यात आलं. परळीत पोहोचल्यानंतर रस्त्यावर लावलेले अभी टायगर जिंदा है चं पोस्टर लक्ष वेधून घेणारं ठरत असल्याचं पाहायला मिळालं. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी या आगळावेगळ्या स्वागत समारंभाचं आयोजन करून टायगर अभी जिंदा है असा मेसेज दिल्याचं दिसून येतंय.

Tags

follow us