Beed News : राज्यात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्ये चर्चेत आहेत. आताही धक्कादायक बातमी बीड जिल्ह्यातूनच समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर एक खळबळजनक पोस्ट केली आह. सोमवारी राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे आकस्मिक निधन झाले. कारण स्पष्ट नाही असे दमानिया यांनी म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टनंतर राज्यात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात मनाली घनवट यांचं निधन झालं. मृत्यूचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे. परंतु आता हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर बीडमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे.
खूप खूप धक्कादायक !
राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही.
पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते.
राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने… pic.twitter.com/m7LmqE35wD
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 21, 2025
खूप खूप धक्कादायक! राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत. त्यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं होतं. राज घनवट धनंजय मुंडे यांच्या कंपनीत डायरेक्टर आहेत. ह्याच राज घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत. याच जमिनीच्या चौकशीची मागणी मी महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.
बाबासाहेब पाटील यांनी सांगितलेला आजार मला झाला नाही; धनंजय मुंडे यांनी काय दिलं स्पष्टीकरण?
व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे आणि राजेंद्र पोपटलाल घनवट दोघे डायरेक्टर आहेत. यांनी जवळपास 11 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना त्रास देऊन 20 कोटींची जमीन फक्त 8 लाख रुपयांत व्यवहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. यानंतर फसवणुकीचं हे प्रकरण समोर आलं होतं.