बीड : तुमच्या मनात जो पर्यंत आहे, तोपर्यंत शरीरात श्वास राहील. माझा जीव तुमच्यात आहे. लाख वेळा जीव देण्याची वेळ आली तरी देईल, पण परळीला विचारल्याशिवाय राजकारणातली कुठलीच घडामोड घडणार नाही, माझा जीव तुमच्यात आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde)परळीत (Parali) भावुक झाले.
या स्वागताचं (Welcome) काय वर्णन करू, शब्द कमी पडतात. जे प्रेम कधीच मिळालं नाही ते आता अपघातातून वाचल्यावर मिळालं. प्रत्येकानं माझं जीवन पाहिलं. राजकीय(Political), सामाजिक (Social Work)काम पाहिलं, कुठली महत्वाकांक्षा ठेवली नाही. फक्त मातीशी इमान राखला. तुमच्या मनात जोपर्यंत आहे, तो पर्यंत शरीरात श्वास राहील. माझा जीव तुमच्यात आहे, असंही आमदार धनंजय मुंडे म्हणाले.
लाखवेळा जीव देण्याची वेळ आली तरी देईल, पण परळीला विचारल्या शिवाय राजकारणातली कुठलीच घडामोड घडणार नाही. 2009 पासून संकट होती मात्र माझ्या सहकाऱ्यांमुळे जिवंत आहे. कायम तुमच्या सेवेत राहील.
Dhananjay Munde : काय ते स्वागत, 101 जेसीबी अन् 10 टन फुलं!
मोडेन पण कुणासमोर वाकणार नाही. ही संकट आले व्यक्तिगत आरोप झाले, कुटुंबावर आरोप झाले, पवार साहेबांनी आणि अजितदादांनी ताकद दिली, म्हणून आज तुमच्यासमोर ऊभा आहे, असं म्हणत धनंजय मुंडे भारावून गेले.