पंकजाताईंना डावलून धनुभाऊंची अंधारेंसाठी बॅटिंग; म्हणाले, ताईसाठी जागा…

Dhananjay Munde On Sushma Andhare : बीड शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhana Yatra) सुरु आहे. यात्रेला खासदार संजय राऊत (Sanajay Raut) आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) ह्या संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांसह परळीतील वैद्यनाथांचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी नेते आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संजय राऊत […]

Untitled Design (8)

Untitled Design (8)

Dhananjay Munde On Sushma Andhare : बीड शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhana Yatra) सुरु आहे. यात्रेला खासदार संजय राऊत (Sanajay Raut) आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) ह्या संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांसह परळीतील वैद्यनाथांचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी नेते आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संजय राऊत यांचे जोरदार स्वागत केले. संजय राऊत यांचा सत्कार करताना सुषमा अंधारे यांना बसायला जागा करुन देताना धनंजय मुंडे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

संजय राऊत यांचा सत्कार करतानाचा फोटो काढताना सुषमा अंधारे ह्या फोटोफ्रेममध्ये येत नव्हत्या. त्यावेळी कॅमेरामॅनने ताईंना जागा द्या असे म्हटले. यावर धनंजय मुंडे म्हणाले की, ताईंसाठी जागा? जागा नसली तरी आम्ही निर्माण करणारे आहेत. आमच्या रक्तात संघर्ष आहे, असे सूचक वक्तव्य केले आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी खासदार संजय राऊत यांचे स्वागत करताना स्वतःच्या हाताने मानाचा फेटा बांधला. धनंजय मुंडे यांचे फेटा बांधण्याचे कौशल्य पाहून संजय राऊत यांच्यासह सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.

आता काँग्रेस नाही राष्ट्रवादीच मोठा भाऊ; जागावाटपाच्या मुद्द्यावर अजितदादांचा पटोलेंना चिमटा

धनंजय मुंडेंनी बांधलेला हा फेटा महाविकास आघाडीला राज्यात सत्तेकडे घेऊन जाणारा ठरेल. हा फेटा इथे धनंजय मुंडे यांच्याकडून बांधून घेतलाय आता राज्यात सर्वत्र विजयाचे फेटे बांधत फिरायचे दिवस येणार आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे हे कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहून सदैव माझ्या पाठीशी उभे असतात, अशा भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या.

Chhota Pudhari; पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्यांना दोन हजाराच्या नोटेचा झटका

बीड शहरात होत असलेल्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत आज परळीत दाखल झाले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह संजय राऊत यांचे स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी एकत्रित जाऊन वैद्यनाथांचे दर्शनही घेतले.

Exit mobile version