धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामास सुरूवात, 22 महिन्यांत काम होणार पूर्ण…; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

धाराशिव - तुळजापूर - सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास प्रारंभ झाला. ठाकरे सरकारने अडीच वर्षाच्या काळात निधी न दिल्यानेच काम रखडले होते.

Dharashiv Railway News

Dharashiv Railway News

Dharashiv Railway News:  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या (Dharashiv-Tuljapur-Solapur Railway) कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. धाराशिव ते तुळजापूर या बहुचर्तित रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagajitsingh patil) यांच्या हस्ते या पहिल्या टप्प्याचे भूमिपजून झाले. यावेळी बोलतांना त्यांना महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadiv) जोरदार टीका केली.

शिंदेंना हव्यात 120 जागा, अजित पवार ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार, भाजप काय निर्णय घेणार? 

ठाकरे सरकारने अडीच वर्षाच्या काळात निधी न दिल्यानेच या महामार्गाचे काम रखडले होते, अशी टीका राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

ठाकरे सरकारने एक रुपयाचाही निधी दिला नाही…

यावेळी बोलतांना ते म्हणाले, धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वेमार्गाचे काम आजपासून सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर 2019 मध्येच प्रकल्पाचे काम सुरू व्हायला हवे होते. मात्र, दोन-अडीच वर्षात ठाकरे सरकारनं राज्य सरकारच्या हिस्स्याचा एक रुपयाही निधी या रेल्वे मार्गाला दिला नाही, अशी टीका करत महायुती सरकार आल्यानंतर या सरकारने आपल्याला राज्य सरकारच्या हिस्स्याचा पन्नास टक्के निधी उपलब्ध करून दिल्याचं आमदार पाटील म्हणाले.

अमेरिकेतील हिंदूंचा डोनाल्ड ट्रम्पला पाठिंबा, म्हणाले, कमला हॅरिस निवडून आल्यास भारत-अमेरिका संबंध… 

पुढं ते म्हणाले की, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा कालावधी पाच वर्षांवरून अडीच वर्षे करण्यासाठी या कामाचे तीन भाग करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्याचे काम दोन सप्टेंबरपासून सुरू झालं असून तीस महिन्यात हे काम पूर्ण होणार आहेत. मात्र, पुढील 22 महिन्याच्या आता पूर्ण करण्याचे आमचं उद्दिष्ट आहे. पुढच्या दोन टप्प्याचे कामही लवकरच सुरू होईल, असं आमदार पाटील म्हणाले.

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामुळे रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर येणार आहे. या रेल्वे मार्गामुळे धाराशिव येथे जंक्शन होणार आहे. त्यामुळं तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वेने जोडले जाणार असून या परिसरात पर्यटनाला नवी दिशा मिळणार आहे. परिणामी जिल्ह्यातील रोजगार निर्मिती आणि अर्थकारणाला चालना मिळेल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वे मार्गाचे काम सुरू झाल्याने अखेर धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येणार आहे.

Exit mobile version