नागरिकांचा वाढता प्रतिसाद असाच मिळत राहिला तर अपेक्षित विकास पूर्ण होणार -राणाजगजितसिंह पाटील

खुदावाडी येथे प्रचार सभेला जात असताना लोहगाव येथील कार्यकर्त्यांनी राणा पाटील यांचा सत्कार केला. एवढा उशीर होऊन देखील

  • ganesh pokale
  • Written By: Published:
नागरिकांचा वाढता प्रतिसाद असाच मिळत राहिला तर अपेक्षित विकास पूर्ण होणार -राणाजगजितसिंह पाटील

Tuljapur Assembly Election 2024 : विधानसभा निवडणूक प्रचारानिमिताने तुळजापूर (Tuljapur ) विधानसभेचे भाजप उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. राणा पाटील यांचे सध्या मतदार संघात गाव-गाव प्रचार सुरू आहे. या प्रचार दौऱ्यात मतदारामध्ये वृद्ध, तरुण, महिला सर्व लोक गर्दी करत आहेत.

याबाबत बोलताना राणा पाटील म्हणाले, अनेक ठिकाणी रस्त्यात गाडी थांबवून लोक प्रेमापोटी माझा सत्कार करत आहेत. निवडणुकीसाठी शुभेच्छा देत आहेत. नागरिकांचा वाढता प्रतिसाद असाच मिळत राहिला तर आपणास अपेक्षित विकास आणि प्रगती निश्चितच होणार यात शंका नाही. असं ते यावेळी म्हणाले.

रोजगारनिर्मिती आणि तुळजापूरचा कायापालट हेच ध्येय, राणाजगजितसिंह पाटीलांचे मोठे शक्तीप्रदर्शन

खुदावाडी येथे प्रचार सभेला जात असताना लोहगाव येथील कार्यकर्त्यांनी राणा पाटील यांचा सत्कार केला. एवढा उशीर होऊन देखील वाट बघत थांबल्याबद्दल राणा पाटील यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्याचबरोबर राणा पाटील सध्या सर्वांच्या समस्या काय आहेत हे समजावून घेत आहेत. तसंच, सरकार येता त्या सोडवू अशी आश्वासनंही ते देत आहेत.

तसंच, काल रविवारी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करून आशीर्वाद यात्रेस प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भवानी रोड, महाद्वार रोड, कमान वेस गल्ली या प्रमुख मार्गावरून तुळजाभवानी मंदिरापर्यंत ही आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. त्यानंतर आशिर्वाद यात्रेचे भव्य सभेत रूपांतर झाल्याचं पाहायला मिळालं.

follow us