Aurangabad Politics : अहमदनगर पोलिसांच्या मॉकड्रीलवर खा. इम्तियाज जलील बरसले

औरंगाबाद : अहमदनगरमध्ये पोलिसांनी केलेल्या मॉकड्रीलमध्ये नारे तकदीर अल्लाहू अकबर ची नारेबाजी होणे हे खूप दुर्दैवी आहे. यावरून असे दिसून येते की, आतंकी म्हणजे मुसलमान अशी मानसिकता पोलिसांची देखील झाली आहे. मी स्वतः देखील मुसलमान आहे. मी साध्वी प्रज्ञा सिंग नाही मी अजमल कसाब नाही, आतंकी म्हणजे मुसलमान अशा प्रकारची जी मानसिकता बनवली आहे. यावरून […]

Untitled Design (7)

Untitled Design (7)

औरंगाबाद : अहमदनगरमध्ये पोलिसांनी केलेल्या मॉकड्रीलमध्ये नारे तकदीर अल्लाहू अकबर ची नारेबाजी होणे हे खूप दुर्दैवी आहे. यावरून असे दिसून येते की, आतंकी म्हणजे मुसलमान अशी मानसिकता पोलिसांची देखील झाली आहे.

मी स्वतः देखील मुसलमान आहे. मी साध्वी प्रज्ञा सिंग नाही मी अजमल कसाब नाही, आतंकी म्हणजे मुसलमान अशा प्रकारची जी मानसिकता बनवली आहे. यावरून अहमदनगरच्या एसपींनी, महाराष्ट्राच्या डीजींनी माफी मागावी तसेच पोलिसांचे नेतृत्व करणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावरून देशातील मुस्लिमांची माफी मागावी अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

तसेच असे कृत्य जर पोलिसांकडून होत असेल तर याच्याहून वाईट काय आहे. याची आम्ही निंदा करतो अशा शब्दात त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version