Download App

रांजणगावच्या तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

  • Written By: Last Updated:

Four children drowned while swimming : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या चारही मुलांचे वय 12 ते 14 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी संभाजीनगरच्या वाळूज भागातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली.

मायक्रोसॉफ्टने Apple ला मागे सारलं! जगातील सर्वात महागडी कंपनी बनली… 

अधिक माहितीनुसार, संभाजीनगर येथील वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव शेणपुंजी परिसरात असलेल्या तलावात काही मुले पोहण्यासाठी गेली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही माहिती अग्निशमन दलालाही देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाने बुडालेल्या चार मुलांना बाहेर काढले. मात्र दुर्दैवाने चारही मुलांचा मृत्यू झाला आहे. यानंतर या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

बिश्वजीतकुमार सुखदेव उपाध्याय (१२), अबरार जावेद शेख (१२), अफरोज जावेद शेख (१४) अशी मृत मुलांची नावे आहेत. यातील एका 14 वर्षीय मुलाची ओळख अद्याप पटलेली नाही.

आज (11 जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडली होते. मात्र, सायंकाळ होऊनही ते परतले नाहीत. मुलं घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. रांजणगाव शेणपुंजी परिसरात सर्वत्र मुलांचा शोध घेण्यात आला. पालकांनी आजूबाजूला चौकशी केली असता ही सर्व मुले पाझर तलावावर गेल्याची माहिती मिळाली. पालकांना तलावाच्या काठावर कपडे व मोबाईल दिसून आले. ते आपल्याच मुलांचे असल्याचं लक्षात आल्यावर त्यांना मुले बुडाल्याची खात्री झाली.

दरम्यान, घटनेची माहिती अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळज पोलीस व गावात दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निगशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या शोध मोहिमेनंतर लहान मुलांचे मृतदेह सापडले. मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

 

 

 

follow us