Download App

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; खुर्च्या फेकून देत घातला गोंधळ…

Gautami Patil : मागील काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा न झाल्याचं समोर आलं होतं, या चर्चांना पूर्णविरामच मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाल्याचं समोर आलं आहे. परभणीमध्ये दहिहंडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात तरुणांना गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. तरुणांच्या गोंधळामुळे आयोजकाला कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला आहे.

हॉकीमध्ये पाकिस्तानला धक्का, ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेचे यजमानपद गमावले

यंदाच्या दहीहंडी उत्सवात राज्यातील अनेक ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईनंतर आज गौतमी पाटीलचा परभणीत नियोजित कार्यक्रम होता. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की तरुणांची तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. आजच्या कार्यक्रमालाही तरुणांची तुडूंब गर्दी झाल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमादरम्यान, गौतमी पाटील स्टेजवर नृत्य सादर करीत असताना तरुणांकडून जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालंय.

Samudrayaan Mission : चांद्रयान-3 नंतर समुद्रयान मोहीम! समुद्राचा तळ गाठणार ‘मत्स्य 6000’

गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरु असतानाच समोर तुफान गर्दी असलेल्या ठिकाणी काहीतरी गोंधळ झाल्याचं दिसून आलं. सुरुवातील हा गोंधळ मिटेल असं वाटलं पण काही वेळानंतरही गोंधळ सुरुच असल्याचं दिसून आलं. यावेळी तरुणांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या फेकून देत मोठा राडा घातल्याचं पाहायला मिळालं आहे. हा गोंधळ काही केल्या शांत होत नसल्याने आयोजकांनी अखेर हार मानत कार्यक्रम आटोपता घेतला आहे.

दरम्यान, कार्यक्रमात प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीच्या घटना सातत्याने घडत असल्याचं मागच्या काळात दिसून आलं असाच एक प्रकार नगर शहरात घडला होता. शहरातील नागापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास गर्दीही जमली होती. मात्र, त्याचवेळेस काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा परभणीत तिच्या कार्यक्रमात तरुणांनी हैदोस घातल्याचं पाहायला मिळालंयं.

Tags

follow us