Download App

मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवीचे नाव दिल्याने शरद पवार गडबडून गेले, पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar on Sharad Pawar : बारामती येथील मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने केली होती. मेडिकल काँलेजच्या नामकरणावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नामकरणाची घोषणा झाल्यानंतर शरद पवार गडबडून गेले होते, असे त्यांनी म्हटले आहे.

अहिल्यादेवी होळकरांचे नाव सोलापूर विद्यापीठाला दिले, अहिल्यादेवीच्या नावाने अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर झाले. निर्णय फक्त कागदोपत्री राहिला आहे. बारामतीच्या मेडिकल काँलेजला अहिल्यादेवीचे नाव दिले आहे. याची कधी कल्पना केली होती का? त्या कॉलेजला शरद पवारांचे नाव द्यायचे होते. या नावाचे घोषणा झाल्यानंतर शरद पवार गडबडून गेले होते. काय कराव हे त्यांना सूचत नव्हतं. त्यांना वाटतं ही जहागिरदारी आपली आहे. सरकारची मालमत्ता म्हणजे आमची मालमत्ता असं समजतं होते पण वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंगोली येथे सांगितले.

उद्धव ठाकरेंना दादा भुसेंचे प्रत्युत्तर, ‘एक रुपयांत पीक विमा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य’

दरम्यान, बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 3 जानेवारी 2013 रोजी मान्यता मिळाली होती. बारामती येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली होती. 5 जुलै 2019 रोजी प्रथम वर्षाकरिता 100 विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्यात आली होती.

Tags

follow us