Download App

Hasan Mushrif : शरद पवार अन् अजितदादा एकत्र येणार का? मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं

Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वात आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याच्या घटनेला दोन महिने पूर्ण होतील. तरीही आता दोन्ही गट एकत्र येतील का?, अजितदादा परत येण्याचा निर्णय घेतील का? असे प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांवर आता राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उत्तर दिलं आहे. त्यांच्या या उत्तराने दोन्ही गट एकत्र येण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘सरकार आपल्या दारी थापा मारतंय लय भारी’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपापले मार्ग निवडले आहेत. त्यामुळे हे दोघेही तूर्त एकत्र येतील असे वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव येथील कार्यालयास मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ईडीच्या कारवाईमुळे भाजपसोबत गेलात, असे आपल्याबाबत सांगितले जात आहे असे विचारले असता मुश्रीफ म्हणाले, 2014 मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला होता. चर्चाही झाली होती. 2017 आणि 2019 मध्येही निर्णय घेतला होता. तेव्हा माझ्यावर कोणतीही ईडीची कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आता जे माझ्यावर आरोप होत आहेत त्यात काहीच तथ्य नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

राष्ट्रवादीत कोणतीच फूट नाही असे वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे यामागे पवार साहेबांचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्हाला आशीर्वाद आहे की नाही हे मी कसं सांगणार, याबाबत त्यांनाच विचारा, असेही मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले. यानंतर आता शरद पवार गटातील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी दिलं नवीन नाव; म्हणाले, ‘फडतूस, कलंक, आता..,’

Tags

follow us