‘सरकार आपल्या दारी थापा मारतंय लय भारी’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray : शेतकरी हवालदिल आहेत आणि सरकार फिरतंय. आज आपला कार्यक्रम सुरु असताना पलिकडच्या जिल्ह्यात एक कार्यक्रम होता. ‘सरकार आपल्या दारी’ (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम होता पण ‘सरकार आपल्या दारी अन् थापा मारतंय लय भारी’, हे थापा मारणारे सरकार आहे, असा हल्लाबोल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंगोलीच्या सभेतून (Hingoli Sabha) राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर केला.
सांगायला देखील लाज वाटते अतिवृष्टी झाली होती त्याची अजून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. आता दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. शेतकऱ्यांना विचारा अतिवृष्टी झाली होती त्याची तुम्हाला मदत मिळाली का? आता दुष्काळ आहे. शेतकऱ्यांचा गुन्हा काय कळत नाही. अस्मानी संकट आपण समजू शकतो पण ही गद्दारांची सुलतानी आली आहे, ह्या सुलतानीचे संकट त्यापेक्षा मोठं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केले.
नाग उलटा फिरुन डसायला लागला, त्याचा उद्धटपणा चिरडून टाका; उद्धव ठाकरेंचा बांगरांवर हल्लाबोल
एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यांवर आला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे जे काही असेल ते सर्व चिरडून टाकायचे काम राज्यातले सरकार आणि दिल्लीचे सरकार करत आहे. राज्य सरकारने मध्यस्थी केली पाहिजे. निर्यात शुल्क वाढले. शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळत असतील तर ते देण्याचे काम सरकारने केले पाहिजे. ग्राहकांना देखील परवडणाऱ्या भावात कांदा दिला पाहिजे. पण सरकार बघायला तयार नाही.
ठाकरेंची नगर जिल्ह्यात ताकद वाढणार…; साजन पाचपुते ‘शिवबंधन’ बांधणार
शिंदे गडाकडून बाळासाहेब ठाकरेंच नाव वापरल्या जात असल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका आहे. माझ्या वडिलांच नाव का वापरता? दिल्लीतील वडिलांमध्ये हिम्मत नाही का? असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लागवला.