Download App

नांदेडच्या सरकारी रुग्णालयाला मुश्रीफांची भेट, ‘प्रत्येक रुग्णांच्या मृत्यूची चौकशी होणार’

Nanded Hospital Death : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Hospital Death) धक्कादायक 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याजी घटना सोमवारी समोर आली होती. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर पुढच्या 24 तासात पुन्हा सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली आहे.

ही घटना धक्कादायक असून याची सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी रुग्णालयात औषधांचा तुटवडा नसल्याचे सांगून कोणाचाही निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. ते म्हणाले, नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रत्येक मृत्यू प्रकरणाची समितीमार्फत चौकशी केली जाईल. उणिवा आहेत आणि आम्ही त्या दूर करू. पुढील 15 दिवसांत रुग्णालयात बदल दिसून येतील.

‘ठाकरेंकडे दहावेळा गेलो पण एकनाथ शिंदेंनीच..,’; शिंदे गटाच्या आमदाराचा आरोप

हसन मुश्रीफ आज दुपारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तेथे ते दुर्घटना घडलेल्या दवाखान्यात परिस्थितीची पाहणी करुन आढावा घेतला. नांदेड मधील घटनेनंतर राज्यभरातील यंत्रणा सतर्क झाल्या असून या घटनेनंतर राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. औषधांचा तुटवडा असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

मुश्रीफ म्हणाले की, रूग्णालयात सुमारे 500 खाटांची मंजूर संख्या आहे, परंतु सुमारे 1,000 रूग्ण दाखल करण्यात आले होते आणि यामध्ये कमी वजनाच्या मुलांचा समावेश होता ज्यांची प्रकृती गंभीर होती.

कॅबिनेटला दांडी, प्रमुख नेतेही देवगिरीवर; नेमकी अजितदादांचे काय बिघडले ?

वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणाले, सुटीमुळे आणि खाजगी आरोग्य युनिट बंद झाल्यामुळे रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. रुग्णालयाच्या डीनचे पद तातडीने भरण्यात येणार आहे. रुग्णालय मोठ्या जागेवर पसरले असून, साफसफाईची गरज आहे. साफसफाईचे काम ‘आउटसोर्स’ करता येते का ते पाहू.

Tags

follow us