कळमनुरी बाजार समिती निवडणुकीत आमदार बांगरांना ‘दे धक्का’

Hingoli Market Committee Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ लागले आहे. दरम्यान अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर काही ठिकाणी सत्तापलट झाल्याचे देखील चित्र समोर आले आहे. यातच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेली कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांना धक्का बसला आहे. येथे 17 […]

Untitled Design   2023 05 01T164103.755

Untitled Design 2023 05 01T164103.755

Hingoli Market Committee Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ लागले आहे. दरम्यान अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर काही ठिकाणी सत्तापलट झाल्याचे देखील चित्र समोर आले आहे. यातच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनलेली कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांना धक्का बसला आहे. येथे 17 पैकी 12 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला.

राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. यातच सध्या या निवडणुकीतील आकडेवारीवरून आगामी निवडणुकांची गणित बसवण्याची कामे सध्या राजकीय पक्षांकडून केली जात आहे. यातच अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या गडाला खिंडार पडल्याच्या घटना घडल्या आहे. तर काही ठिकाणी विजय मिळवण्यात यश आले आहे.

यातच हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे सेना व भाजप युती अशी सरळ लढत होती. यातच उद्धव ठाकरेंशी बंड झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेले आमदार संतोष बांगर यांच्या दृष्टीने देखील हि निवडणूक अत्यंत महत्वाची होती. बांगर यांचे होम ग्राउंड असल्याने या मार्केट कमिटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान या निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का बसला आहे. 17 पैकी 12 जागा जिंकत महाविकास आघाडीने विजयाचा गुलाल उधळला आहे. तर दुसरीकडे नांदेडातही खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर याना फटका बसला आहे. यांना नांदेड बाजार समितीत एकही जागा जिंकता आली नाही. 18 पैकी 17 जागा महाविकास आघाडीला देत मतदारांनी बंडखोरांना जागा दाखवून दिल्याचे समोर आले आहे.

जवळावर मविआचा झेंडा…
हिंगोलीतील जवळा बाजार समितीवरही महाविकास आघाडीने 18 पैकी 16 जागा जिंकल्या. येथेही भाजप-शिदें गटाचा सुपडा साफ झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार समितीच्या 18 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. महाविकास आघाडीने 16 जागांवर दणदणीत विजय मिळविला. भाजप व शिंदे गटाच्या सर्वपक्षीय पॅनलला केवळ 2 जागांवर यश मिळवता आले.

Exit mobile version