Honour Killing: प्रेमसंबंधातून आई-वडिल, भावांनी मिळून मुलीला संपविले

नांदेडः गावातील तरुणाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या आई-वडिल, दोन भाऊ आणि मामाने मिळवून तरुणीची हत्या केली. मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राखही ओढ्यात टाकून पुरावा नष्ट केला. ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महिपाल गावात घडली आहे. या ऑनर किलिंगने ( Honour Killing) महाराष्ट्रात खळबळ उडाली. गेल्या महिन्यात औरंगबाद जिल्ह्यामध्येही अशीच घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी […]

Crime

Crime

नांदेडः गावातील तरुणाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या आई-वडिल, दोन भाऊ आणि मामाने मिळवून तरुणीची हत्या केली. मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राखही ओढ्यात टाकून पुरावा नष्ट केला. ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महिपाल गावात घडली आहे. या ऑनर किलिंगने ( Honour Killing) महाराष्ट्रात खळबळ उडाली. गेल्या महिन्यात औरंगबाद जिल्ह्यामध्येही अशीच घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना आहे.

शुंभागी जोगदंड ( Shubhangi Jogdand) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. ती बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. या प्रकरणी मुलीचे आई-वडिल, दोन भाऊ आणि मामा अशा पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती लिंबगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. शुंभागी हिचे गावातील तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्याला तिच्या घरच्यांचा विरोध होता. मुलीच्या इच्छेविरुध्द पालकांनी तीन महिन्यांपूर्वी दुसरीकडे लग्न जुळवले होते. परंतु प्रेमसंबंधामुळे ठरविलेले लग्नही मोडण्यात आले होते.

मुलीने लग्न मोडल्याने तिच्या घरचे संतापले होते. तसेच गावात बदनामी झाल्याचा राग त्यांच्या मनात होता. त्यातून पाचही जणांनी मिळवून रविवारी शुभांगीची हत्या केली. त्यानंतर घराजवळच मृतदेह जाळून टाकला. पुरावा राहू नये म्हणून मृतदेहाची राखही गावातीलच ओढ्यात नेऊन टाकली होती.

शुभांगी ही गेल्या तीन दिवसांपासून गावातून गायब होती. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. मुलीच्या आई-वडिलांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी आई-वडिल, दोन भाऊ आणि मामाने मिळवून मुलीचे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version