अखेर जालन्यातही भाजप-शिवसेनेची फारकत, आमदार लोणीकर यांनी युती तुटल्याची केली घोषणा

जालना महानगर पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याची माहिती भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 30T174029.329

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय (Election) वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, काही ठिकाणी महायुती एकत्र लढत आहे तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवल्या जात आहे. अशातच जालना महानगर पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे. याबाबत माहिती भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

जालना महानगर पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याची माहिती भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. राज्याच्या धोरणांच्या सूत्रामध्ये ही युती न बसल्यामुळे तुटल्याचे बबनराव लोणीकर म्हणाले. जालना महानगर पालिकेत भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे लोणीकर म्हणाले. जालना महानगर पालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याचे अखेर जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळं जालना महानगरपालिकेत महायुती स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याच स्पष्ट झालं आहे.

मोठी बातमी! अखेर भाजप-शिवसेना युती तुटली, राज्यात तब्बल 14 ठिकाणी फारकत

भाजप आणि शिवसेनेमध्ये काही जागेवरती वाद होता. राज्याच्या धोरणांच्या सूत्रामध्ये ही युती न बसल्यामुळं तुटली असल्याचं भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हंटलं आहे. त्यामुळं जालना महानगरपालिकेच्या निवडणुकी भाजप आणि शिवसेना आमने सामने येणार आहेत. त्यामुळं महायुतीतच या ठिकाणी ठिगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय मतभेद पाहता जालन्यात युतीवर एकमत होऊ शकत नाही याची जाणीव दोन्ही पक्षांना झाल्याचं चित्र दिसत होतं.

अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे. कैलास गोरंट्याल यांनी गद्दारी करणार नाही याची शाश्वती द्या, धमकीची भाषा नको, शिवसेनेने महापौर पदाचा उमेदवार आधीच जाहीर केला त्याचे काय? असे प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली होती. त्यामुळं अर्जुन खोतकर यांनी देखील युतीचा नाद सोडल्याचे बोलले जात होते.अखेर आद भाजप आणि शिवसेना या दोनही पक्षाची युती तटलय्चा भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळं आता हे दोन्ही पक्ष आमने-सामने लढणार आहेत.

follow us