ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शीतल म्हात्रे (sheetal mhatre) यांच्या प्रकरणांमध्ये लवकर कारवाई करून लक्ष घातले, त्याचप्रमाणे संजय शिरसाठ यांच्या सुद्धा या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश देतील. अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे. या तक्रारीसाठी मी आग्रह धरला आहे असंही यावेळी सुषमा अंधारे (sushma andhare) म्हणाल्या.
मागील आठवड्यात संजय शिरसाठ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. तर आज संजय शिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे परळी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यापूर्वी अंधारे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान आता यानंतर सुषमा अंधारे यांनी परळी शहर पोलीस ठाणे गाठून शिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे.
निवडणुका कधीही होतील, तयार राहा ; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आदेश
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की संजय शिरसाट यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संभाजीनगर आणि पुणे येथील परळ या ठिकाणी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, तसा आम्ही प्रयत्न केला पण एकाही ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. म्हणून महिला आयोगाकडे कळवून महिला आयोगाने तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहे.
त्या पुढे म्हणाल्या की आता पुढे काय कार्यवाही आहे ते लवकरच कळेल. मात्र म्हातारी मेल्याचे दुःख होत नाही परंतु काळसोकावतो, ज्याप्रमाणे शिंदे गटाचे आमदार महिलांबद्दल सातत्याने बेताल वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना कुठेतरी चाप बसली पाहिजे.
Maharashtra Politics: तानाजी सावंतांच्या ‘त्या’ विधानावर राजकीय वर्तुळात चर्चा!
ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणांमध्ये लवकर कारवाई करून लक्ष घातले. त्याचप्रमाणे संजय शिरसाठ यांच्या या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश देतील अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे.