Maharashtra Bhushan Puraskar वादात, पुरस्कार परत घ्या अन्यथा आंदोलन करणार

औरंगाबाद : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) वादात सापडला आहे. आप्पा धर्माधिकारी यांना दिलेला पुरस्कार परत घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी याबाबत पत्रक काढले असून, आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घ्यावा अन्यथा […]

Untitled Design (6)

Untitled Design (6)

औरंगाबाद : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) वादात सापडला आहे. आप्पा धर्माधिकारी यांना दिलेला पुरस्कार परत घेण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) केला आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी याबाबत पत्रक काढले असून, आप्पा धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्वरित परत घ्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड, जनआंदोलन उभे करेल. तसेच त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल, असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने दिला आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना शिवानंद भानुसे म्हणाले की, महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्रामध्ये सुरू केला त्याचं कारण असं होतं की, महाराष्ट्रातील लोकजीवन, महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवन किंवा विविध क्षेत्रातील महाराष्ट्राला आणि इथल्या रयतेला, जनतेला भूषण वाटावं असं काही वेगळं काम करणारा जो कोणी व्यक्ति असेल त्यांचा या यानिमिताने सत्कार केला जावा.

Sharad Pawar गौप्यस्फोटावर महाजनांचा पलटवार, ‘देशमुखांनाच भाजपमध्ये येण्याची इच्छा’

आप्पा धर्माधिकारी किंवा त्यांचे वडील पूर्वी नाना धर्माधिकारी यांना समाजसेवा म्हणून पुरस्कार दिला जातो. तर यांच्या हातून अशी कुठलीही समाजाची सेवा घडल्याचं आम्हाला माहिती नाही. कारण की हे पूर्णतः आरएसएसचे काम करतात. रामदासी बैठका घेतात. तसेच सर्वसामान्य माणसांची, महिलांची, तरुणांची दिशाभूल करतात, असा आरोप त्यांनी केला.

या राज्याला या देशाला जो जिजाऊ, शिवरायांचा एक वारसा लाभलेला आहे. समतावादी, समानतावादी, मानवतावादी त्या सर्व बाजूंनी जर विचार केला तर त्यांना त्याचा पूर्णपणे विरोध आहे. आणि अशा लोकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे हे अत्यंत चुकीच आहे. ही आमची मूळ भूमिका असल्याचेही संभाजी ब्रिगेडने म्हटले.

Exit mobile version