जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी पालकांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. त्यांनी स्वत:च्या मुलाला गावातील अंगणवाडीमध्ये टाकले आहे. त्यांच्या साठी बाळाचा प्रवेश LKG, UKG मध्ये करणे काही कठीण नव्हते. परंतु त्यांनी गावातील अंगणवाडीवर विश्वास दाखवत आपल्या बाळाला अंगणवाडीत दाखल केले.(Jalna Ceo Varsha Meena Take Admission Of Her Son In Government Angwanwadi Primary Education)
आजच्या काळात प्रत्येक पालक मुलांना खूप सारे पैसे देऊन खासगी शाळेत प्रवेश घेण्यासाठी पुढे असतो. जिल्हा परिषद शाळेतीत शिकवणाऱ्या शिक्षकांची मुलं ही इंग्रजी किंवा खासगी संस्थाच्या शाळेत शिक्षण घेताना दिसतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वस पडल्याच्या दिसतात. या शाळांकडे पालकांनी परत फिरावं यासाठी वर्षा मीना यांचा निर्णय नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
बेकायदेशीर जमीन व्यवहारप्रकरणात अधिकारी अडकले ! तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी जरे, मुठेंवर गुन्हे
प्रत्येक पालकाचा LKG, UKG साठी आग्रह असतो. मात्र या सर्वांना अपवाद ठरत जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी स्वत:चा बाळाला थेट गावातील शासकीय अंगणवाडीत प्रवेश दिला आहे.आता खुद्द सीईओंचाच मुलगा गावातल्या अंगणवाडी शिकायला येत असल्यानं या शाळेचा दर्जा चांगला असल्याचं पाहायला मिळत आहे.
जालना जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी पालकांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी आणि शाळांचा दर्जा उंचावला असून इथे दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने आपल्या मुलाला या वातावरणात शिकायला हरकत नाही असे त्या म्हणाल्या.