बेकायदेशीर जमीन व्यवहारप्रकरणात अधिकारी अडकले ! तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी जरे, मुठेंवर गुन्हे

बेकायदेशीर जमीन व्यवहारप्रकरणात अधिकारी अडकले ! तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी जरे, मुठेंवर गुन्हे

अहमदनगर : नगरमध्ये बेकायदेशीर जमीन खरेदी-विक्रीचे (Illegal sale and purchase of land) प्रकरण उघडकीस आले आहे. यात नगरचे तत्कालीन तहसिलदार, अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्यासह तब्बल 38 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लाच लुचपत विभागाने (anti corruption) ही कारवाई केली आहे. त्यामुळं महसुल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. (Illegal sale and purchase of land in ahmednagar fir against reveue officer)

2006 मध्ये मौजे वडगांव गुप्ता शिवारातील गट नं. २०३ क्षेत्र २ हेक्टर ९७ आर पोट खराबा ०.०९ आर गट नं. २०५ ही एकूण १ हेक्टर, ३४ आर जमीन महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ ची आहे. मात्र, ही जमिन जुन्या शर्तीवर करणेसाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसिलदार अहमदनगर यांनी बेकायदेशीर परवानगी दिली आहे.

तहसिलदार एल. एन. पाटिल यांनी काढलेल्या आदेशास तत्कालीन तलाठी एल.एस. रोहकले (वडगांवगुप्ता), दुर्गे (तत्कालीन मंडळ अधिकारी, नालेगांव) यांनी मदत केली आहे व खरेदी विक्री व्यवहाराच्या नियमबाह्य फेरफार नोंदी घेवून उत्कर्ष पाटिल व अजित लुंकड यांना मदत केली आहे. ही जमिन अजित कचरदास लुंकड (अहमदनगर) यांनी खरेदी केली आहे.

NDA vs INDIA ; विरोधी पक्षांच्या ‘INDIA’नावावर आक्षेप, दिल्ली पोलीसात तक्रार 

तसेच तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अहमदनगर व्ही. टी. जरे आणि तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुठे यांना सदरचा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती असूनही कुठलीही कारवाई न करता, बेकायदेशीर व्यवहारात सहभागी होवून या बनावट व्यवहारास एक प्रकारे प्रोत्साहन दिले. तर तत्कालीन सह दुय्यम निबंधक दिलीप बबन निराली यांनी खरेदी विक्रीचे बेकायदेशीरपणे दस्त नोंदविले आहे. ही जमिन महार वतन हाडोळा इनाम वर्ग ६ब ची जमिन असल्याचे माहित असून खोटे कागदपत्र तयार करुन, या जमीनीचे खरेदी विक्री व्यवहार करून शासनाची फसवणूक केली.

या प्रकरणी एल. एन. पाटिल, एल.एस. रोहकले, दुर्गे, व्ही. टी. जरे, राजेंद्र मुठे,दिलीप बबन निराली यांच्यासह तब्बल 38 जणांवर गुन्हे नोंदवले आहेत.

याबाबत एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ से कलम १३(१)(ड) सह १३(२) सह भा. दं. वि. क.१६७, ४२० १०९ प्रमाणे 19 जुलै 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे करत आहेत.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube