“काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात, कशातही..” पंकजा मुंडेचा रोख कुणाकडे?

राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. आपण त्यात किती दिवस तुरटी फिरवायची. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करत असतात.

Pankaja Munde

Pankaja Munde

Pankaja Munde : राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. आपण त्यात किती दिवस तुरटी फिरवायची. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करत असतात. कशातही आपलं नाव ओढतात अशी खंत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी (Pankaja Munde) व्यक्त केली. जालना जिल्हा शिवसेनेच्यावतीने मंत्री मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुंडे बोलत होत्या. दरम्यान, राज्यात सध्या बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहेत. येथे मागील काही काळात ज्या घटना घडल्या आहेत. त्यावरून धनंजय मुंडे यांनी लक्ष्य केले जात आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केले आहे. यात त्यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे.

महंत नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; सुरेश धस यांची एका वाक्यात प्रतिक्रिया

मला कार्यकर्त्यांचं प्रेम मिळालं. मला कायमच वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा मी कशा पूर्ण करणार. मला खरंच टेन्शन येतं. मला तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यांत स्व. गोपीनाथ मुंडे दिसतात. माझं कौतुक गोपीनाथ मुंडे करायचे तसेच तुम्हीही करता. मुंडे साहेब विचारायचे पंकजा आली का, कशी चालली, कशी बोलली? माझ्यासारखी बोलते का? एक दिवस मला म्हणाले आता माझं काही काम नाही. मी म्हणाले असं का बोलता तर ते म्हणाले समाज ज्या हातांत द्यायचा ते हात आता तयार झाले. मी पुढील निवडणूक लढणार नाही असे मुंडे साहेब म्हणाले होते अशी आठवण पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितली.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काय म्हणाल्या पंकजा

विरोधकांकडून सध्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांनी तसा विषय अजून धनंजय मुंडेंकडे केलेला नाही. यात कुणाचा काही संबंध आढळला तर कारवाई करू पण संबंध नसेल तर अन्यायही व्हायला नको, असे स्वतः अजित पवार यांनीच सांगितले आहे. तपास यंत्रणा काळजी घेतील त्यावरच हे सगळं अवलंबून आहे. आपल्याला त्याबद्दल माहिती नाही.

तुम्ही मुंडेंचं अंतःकरण पाहिलं, आम्ही पुरावे; नामदेव महाराज शास्त्रींना दमानियांचा सवाल

Exit mobile version