दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला दिलासा; जायकवाडी प्रकल्पातून पहिले आवर्तन सुरू

Jayakwadi Dam Water Release; जायकवाडी प्रकल्पातून पैठणच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.

Jayakwadi Dam Water Release

Jayakwadi Dam Water Release

Jayakwadi Dam Water Release: राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, राज्य सरकारने 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक भागांत पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जायकवाडी प्रकल्पातून पैठणच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी आता परभणी जिल्ह्यात दाखल झाले असून, रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

Nvidia च्या हुआंग यांचा बाजार उठवणारा खरा मास्टमांईंड कांग वेई; अ‍ॅलिस केवळ मोहरा

जायकवाडीतून पहिले आवर्तन सुरू

जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकीत पाणी सोडण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. मात्र, कालव्यांची साफसफाई आणि दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी पाणी सोडण्यास काहीसा विलंब झाला. त्यानंतर जायकवाडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाण्याचे पहिले आवर्तन सुरू करण्यात आले.

‘टेल टू हेड’ पद्धतीने होणार पाणीवाटप

कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांनाही पाणी मिळावे, यासाठी ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणीवाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पद्धतीत कालव्याच्या शेवटच्या भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी पोहोचवून त्यानंतर पुढील भागात पाणी सोडले जाते. तसेच, अनधिकृत पाणीउपसा रोखण्यावरही भर देण्यात येणार आहे.

गोकुळच्या निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणात काय पडसाद उमटणार? सतेज पाटील यांनी दिले मोठे संकेत

परभणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीही जायकवाडीचे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे. रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही आवर्तनाची मागणी केली होती. आता जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी परभणी जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दुष्काळी परिस्थितीत रब्बी हंगामातील पिके टिकवण्यासाठी जायकवाडीच्या पाण्याचा मोठा आधार मिळणार आहे.

Exit mobile version