Download App

‘एसआयटीमध्ये वाल्मिक कराडचेच पोलीस…’; पुरावे देते आव्हाडांचे तपासावरच पश्नचिन्ह

मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेले 10 वर्षे तो बीड एलसीबीमध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय,

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात आतापर्यंत सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून हे सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) यालाही अटक करण्यात आलीये. आता या प्रकरणात सरकारने एसआयटी (SIT) चौकशी नेमली. सरकारने नेमलेल्या एसआयटीमध्ये वाल्मिक कराडच्या जवळचे पोलीस अधिकारी असल्याचा खळबळजनक शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला.

९ जानेवारीला राज्यातील ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन, संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषदेचा निर्णय… 

जितेंद्र आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवर काही फोटो शेअर करत एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, संतोष देशमुख प्रकरणात सरकारने नियुक्त केलेल्या एसआयटीमध्ये एक प्रमुख बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलिस आहेत. यातील एक पीएसआय महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन् प्रेमाचे संबंध आहेत पहा… हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडणुक काळात धनंजय मुंडेचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलेले आहे, असं आव्हाड म्हणाले.

दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेले 10 वर्षे तो बीड एलसीबीमध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय, असं आव्हाड म्हणाले.

तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही असाच आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोनवणे म्हणाले की, विधानसभा निकालाच्या दिवशी महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड यांनी एकत्र विजयाचा आनंद साजरा केला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमलेल्या एसआयटीमध्ये महेश विघ्ने यांचा समावेश करण्यात आला आहे. जर आरोपीचा मित्रच तपास करणार असेल तर किती चांगल्या पद्धतीने चौकशी केली जाईल, याचा विचार केला पाहिजे, अशी टीका सोनवणेंनी केली.

बीड, परभणी, पुण्यातही सर्वपक्षीय मोर्चे
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली. याप्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. याशिवाय आरोपींना मदत करणारे सिद्धार्थ सोनवणे आणि डॉ.संभाजी वायभसे यांनाही अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी बीड, परभणी, पुण्यातही सर्वपक्षीय मोर्चे काढण्यात आले. यावेळी संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

follow us