Download App

अमित शाहांना भेटणार म्हणताच शाह तडक नांदेडात; पंकजा मुंडे काय बोलणार?

Amit Shah in Nanded : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांची आज नांदेडात सभा होत आहे. या सभेस भाजप नेत्या पंकजा मुंडेही (Pankaja Munde) उपस्थित राहणार आहेत. मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची नाराजी बोलून दाखवली होती. तसेच आपण अमित शाह यांची भेट घेणार असल्याच्याही त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आज शाहा महाराष्ट्रात येत असल्याने त्यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

पंकजा मुंडे काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. स्वतः मुंडे यांनीच अनेक वेळा ही नाराजी बोलून दाखविली आहे. मागील महिन्यात राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुंडे यांनी मी भाजपची आहे पण भाजप थोडीच माझा आहे असे वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बराच गदारोळ उडाला होता. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चाही जोरात सुरू झाल्या होत्या.

ओमराजे निंबाळकरांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न; उडी मारल्यानं थोडक्यात बचावले

राज्यात पराभव झालेल्या अनेकांना आमदारकी, खासदारकी आणि मंत्रिपदे मिळाली. मात्र माझ्यात काहीतरी कमतरता असेल म्हणून मला मिळाले नाही, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती. तसेच याबाबत आपण अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज अमित शाह यांची नांदेडात सभा होत आहे. पंकजा मुंडेही या सभेला उपस्थित असतील. त्यामुळे व्यासपीठावरून त्या काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मुंडे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, अद्याप तरी तसे काहीच घडलेले नाही. आता तर खुद्द अमित शाहाच नांदेडात येत आहेत. त्यामुळे या सभेत पंकजा मुंडे काय बोलणार, त्या आपली नाराजी पुन्हा बोलून दाखवतात की अन्य काही बोलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

NCP चे संस्थापक सदस्य आता कुठे आहेत?

Tags

follow us