News Area India Survey : फडणवीसांचे लाडके अभिमन्यू पवार पराभवाच्या छायेत!

News Area India Survey Maharashtra :  न्यूज एरेना इंडिया या संस्थेने  सर्व्हे केला असून राज्यात 2024च्या विधानसभेत भाजपला बहुमत दाखवले आहे. या कंपनीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. याच कंपनीने आता महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा करण्यात आला […]

Letsupp Image   2023 06 19T173418.657

abhimanyu Pawar Devendra Fadanvis

News Area India Survey Maharashtra :  न्यूज एरेना इंडिया या संस्थेने  सर्व्हे केला असून राज्यात 2024च्या विधानसभेत भाजपला बहुमत दाखवले आहे. या कंपनीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. याच कंपनीने आता महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. राज्यातील आगामी 2024 च्या विधानसभा दृष्टीने अनेक अंदाज वर्तवले जात आहे. या अगोदर सकाळ वृत्त समूह आणि झी वृत्त समूह यांनी एक सर्व्हे प्रदर्शित केला होता.  न्यूज एरेना इंडियाच्या सर्व्हेमध्ये भाजपला राज्यभरात 123 ते 129 सीट, शिवसेनेला 25 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 50-56 जागा, काँग्रेसला 50-53 जागा, ठाकरे गटाला 17-19 जागा आणि अन्य 12 असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दोन सर्व्हेमध्ये पिछाडीवरील फडणवीस आले आघाडीवर; भाजप स्वबळावर गाठणार सव्वाशेचा आकडा

या सर्व्हेनुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी ओएसडी अभिमन्यू पवार यांचा लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून पराभव होताना या सर्व्हेत दिसत आहे. त्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून येत असल्याचे यासर्व्हेतून समोर आले आहे. 2019 साली अभिमन्यू पवार यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार बसवराज पाटील यांना पराभूते केले होते. आता मात्र, या सर्व्हेनुसार अभिमन्यू पवारांचा पराभव होताना दिसत आहे. अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीला 2019 साली त्यांच्याच मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता.

News Arena India Survey : पृथ्वीराज चव्हाण 2024 मध्ये पराभूत होणार? भाजपसाठी गुड न्यूज

लातूर जिल्हा सर्व्हे 

लातूरमध्ये देखील तीन जागा भाजपला व तीन जागा काँग्रेसला दाखविण्यात आल्या आहे. यातील लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसाच्या जागेवर काँग्रेस विजयी होताना दिसत आहे. तर अहमदपूर, उदगीर आणि निलंगा या जागेवर भाजपचा विजय होतान समोर आले आहे.

सध्याची स्थिती

सध्या लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीण, लातूर शहर, या जागांवर काँग्रेसचे धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे आमदार आहे. तर अहमदपूर आणि उदगीरच्या जागेवर बाबासाहेब पाटील आणि संजय बनसोड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे. यासह निलंगा आणि औसाच्या जागेवर संभाजीपाटील निलंगेकर आणि अभिमन्यूप पवार हे भाजपचे आमदार आहे.

Latur – BJP : 3, INC : 3

234. Latur Rural : INC
235. Latur City : INC
236. Ahmadpur : BJP
237. Udgir (SC) : BJP
238. Nilanga : BJP
239. Ausa : INC

 

या सर्व्हेनुसार औसाच्या जागेवर अभिमन्यू पवार यांचा पराभव झाल्याचे जरी समोर आले असले तरी अहमदपूर आणि उदगीरच्या जागेवर भाजपचा विजय होताना दाखवले आहे. त्यामुळे भाजच्या अभिमन्यू पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातले दोनही आमदार पराभवाच्या छायेत आले आहे.

Exit mobile version