Download App

News Area India Survey : पंकजांसाठी ‘परळी’ अवघडचं; नवा मतदारसंघ शोधावा लागणार?

News Area India Survey Maharashtra :  न्यूज एरेना इंडिया या संस्थेने  सर्व्हे केला असून राज्यात 2024च्या विधानसभेत भाजपला बहुमत दाखवले आहे. या कंपनीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. याच कंपनीने आता महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. राज्यातील आगामी 2024 च्या विधानसभा दृष्टीने अनेक अंदाज वर्तवले जात आहे. या अगोदर सकाळ वृत्त समूह आणि झी वृत्त समूह यांनी एक सर्व्हे प्रदर्शित केला होता.  न्यूज एरेना इंडियाच्या सर्व्हेमध्ये भाजपला राज्यभरात 123 ते 129 सीट, शिवसेनेला 25 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 50-56 जागा, काँग्रेसला 50-53 जागा, ठाकरे गटाला 17-19 जागा आणि अन्य 12 असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

News Arena India Survey : पृथ्वीराज चव्हाण 2024 मध्ये पराभूत होणार? भाजपसाठी गुड न्यूज

या सर्व्हेमध्ये भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून जरी दाखविण्यात आले असले तरी भाजपच्या दिग्गज नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघातून पराभव पत्करावा लागणार असे दिसते आहे. परळीच्या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार असल्याचे या सर्व्हेमध्ये दाखविण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांनी 2009 साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांचा विजय झाला होता. यानंतर 2014 साली देखील त्यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत विधानसभा गाठली होती. त्यानंतर पंकजा मुंडेंची थेट कॅबिनेटपदी वर्णी लागली होती. पण 2019 साली पंकजा मुंडेंचे कट्टर प्रतिस्पर्धी व त्यांचेच चुलत भाऊ धनंजय मुंडेंनी त्यांचा पराभव केला होता. यावेळेस  पुन्हा परळीच्या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येताना दिसत आहे.

दोन सर्व्हेमध्ये पिछाडीवरील फडणवीस आले आघाडीवर; भाजप स्वबळावर गाठणार सव्वाशेचा आकडा

बीड जिल्हा सर्व्हे 

या सर्व्हेनुसार बीड जिल्ह्यामध्ये भाजपला तीन जागा, राष्ट्रवादीला तीन जागा दाखविण्यात आल्या आहे. त्यात गेवराई, बीड, आणि परळीची जागा राष्ट्रवादीला तर माजलगाव, आष्टी आणि केजची जागा भाजपला दाखविण्यात आली आहे.

सध्याची स्थिती

गेवराईमध्ये लक्ष्मण पवार, केजमध्ये नमिता मुंदडा हे दोघे भाजपचे आमदार आहे. तर परळीमध्ये धनंजय मुंडे, बीडमध्ये संदीप क्षीरसागर, माजलगाव प्रकाश सोळंखे, आष्टीमध्ये बाळासाहेब आजबे हे राष्ट्रीवादीचे आमदार आहे.

Beed – BJP : 3, NCP : 3

228. Georai : NCP
229. Majalgaon : BJP
230. Beed : NCP
231. Ashti : BJP
232. Kaij (SC) : BJP
233. Parli : NCP

या सर्व्हेनुसार भाजपची जिल्ह्यामध्ये एक जागा वाढताना दिसून येत आहे तर दुसरीकडे भाजपला परळीमध्ये पुन्हा पराभवाला सामोरे जाताना दिसत आहे. परळी मतदारसंघ भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंड यांचा बालेकिल्ला मानला जायचा. याच मतदारसंघातून निवडून येत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भुषवले. पण आता मात्र त्याच मतदारसंघात भाजपला दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

 

Tags

follow us