Pankaja Munde: माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असणाऱ्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आज लगेचच खुद्द पंकजा मुंडे या देखील बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. त्यांच्या विरोधातील उमेदवार बालाजी गिते यांनी माघार घेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुंडे यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली.
या गटात उमेदवारी अर्ज दाखल केलेले सदाशिव आप्पा मुंडे यांचे नातेवाईक बालाजी गिते यांनी माघार घेतली आहे.
पंकजा मुंडे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या जवाहर शिक्षण संस्था संचालक मंडळाच्या ३४ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी हितचिंतक सभासद गटातून उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात संस्थेचे सदाशिव आप्पा मुंडे यांचे भाचे बालाजी रामचंद्र गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
Vinod Tawde Committee Report : भाजपचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ अहवालावर तावडेंचं स्पष्टीकरण…
आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बालाजी गिते यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने पंकजा मुंडे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. यापूर्वी आश्रयदाता सभासद गटाची जागा बिनविरोध निवडून आल्याने आता ३२ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
दरम्यान, याआधी शनिवारी धनंजय मुंडे यांचीही या संस्थेवर बिनविरोध निवड झाली. आ. धनंजय मुंडे यांनी आश्रयदाता सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. भगवानगडावरील मेळाव्यानंतर पहिल्याच निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या वाट्याला सदस्यपद आले.
भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूंचा समावेश
एकाच व्यासपीठावर
मागील आठवड्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एका व्यासपीठावर आले होते. यावेळी भगवानगडाच्या भक्त परंपरेत पंकजाताई एक पायरी तर मीही पायरीचा दगड आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यानंतर दोनच दिवसात झालेल्या या बिनविरोध निवडीमुळे चर्चांना उधाण आले आहे. आता पंकजा मुंडे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या 34 पैकी 2 जागा बिनविरोध निवडल्या गेल्या असून 32 जागांसाठी मात्र निवडणूक होणार आहे.