Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष बांधणीसाठी बाहेर पडलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) पहिलीच सभा छगन भुजबळांच्या येवल्यात घेतली होती. त्यानंतर दुसरी सभा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीडमध्ये आज होणार आहे. या सभेआधीच राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे. शरद पवार आज धनंजय मुंडे यांच्यावर काय बोलतात याची उत्सुकता आहे.
मंत्रीपद मिळालं नाही तर नारायण राणे मला..; गोगावलेंनी सांगितले आमदारांच्या मंत्रीपदाचे किस्से
या सभेआधी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात राजकारण जोरात सुरू झाले आहे. माझे फोटो वापरल्यास कोर्टात खेचेन असा इशारा शरद पवारांनी दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरवर पवारांचा फोटो लावला आहे. कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या, अशी साद घालण्यात आली आहे. शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते असून आम्ही त्यांचा सत्कार करणार असेही या बॅनरवर म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आजची सभा घेत अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्लॅन नक्की केला आहे. मात्र, या राजकीय डावाला उत्तर देण्याचा खास प्लॅन अजित पवार गटानेही केला आहे. शरद पवारांनीही भाजपसोबत यावे यासाठी अजित पवार गटाने प्रयत्न केले. पण, शरद पवार आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता अजितदादा गटाने शरद पवारांना उत्तरसभांतून आव्हान देण्याचा निश्चय केला आहे. अजित पवार गटाची पहिलीच सभा बीड जिल्ह्यातच होणार आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा पहिला सामना बीडमध्ये रंगणार आहे. ही उत्तरसभा 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सभेसाठी अजित पवार गटाने वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.
रोहित पवार, तानाजी सावंत भिडले; ‘खेकडा’ अन् ‘बारामती’च्या पॅकेजचा असाही किस्सा!