Download App

“तू तुझ्या पक्षाचं बघ नाहीतर सुपडा साफ होईल”; एकेरीवर येत जरांगेंचा वडेट्टीवारांवर घणाघात

Manoj Jarange Criticized Vijay Wadettiwar : राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation) मंजूर करण्यात आले. मात्र, आरक्षण मान्य नसल्याचे सांगत सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे यांनी संताप व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी असले (Rahul Gandhi) कसे नेते निवडतात, असे जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. वडेट्टीवारांनी आम्हाला दम वगैरे शिकवू नये. राहुल गांधींनी तुम्हाला मराठ्यांच्या नादाला लागायला टीका करायला सांगितले आहे का? हा विरोधी पक्षनेता आहे की कोण आहे? विरोधी पक्षनेता तुझ्या घरातलं पद नाही, ते जनतेचं पद आहे. विरोधी पक्षनेता कोणत्याही एका जातीचा नसतो. आमचा दम कशाला काढता आमचा दम तुम्ही मुंबईत पाहिला नाही का असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी असले नेते कशाला निवडतात काय माहित. तू तुझ्या पक्षाचं बघ नाहीतर सगळा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय करिअरही बर्बाद होईल. राहुल गांधींनी आपल्या नेत्यांना नीट समज द्यावी, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange : सग्यासोयऱ्यांच्या अंमलबाजवणी शिवाय सरकारची सुट्टी नाही, कालचं आरक्षण कुणबी नको म्हणणाऱ्यांसाठी

काय म्हणाले होते वडेट्टीवार ? 

मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दांत आता दम राहिला नाही. जे मिळालंय त्यामध्ये त्यांनी समाधानी रहावे. जरांगे पाटील यांच्या बोलण्यात आता गर्व आणि गुर्मी जाणवते. अशाने जरांगे पाटील यांचा हार्दिक पटेल होईल अशी खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती.

follow us