Manoj Jarange : सग्यासोयऱ्यांच्या अंमलबाजवणी शिवाय सरकारची सुट्टी नाही, कालचं आरक्षण कुणबी नको म्हणणाऱ्यांसाठी

Manoj Jarange : सग्यासोयऱ्यांच्या अंमलबाजवणी शिवाय सरकारची सुट्टी नाही, कालचं आरक्षण कुणबी नको म्हणणाऱ्यांसाठी

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून लढा देत असलेल्या मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी आज पुन्हा आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, काल सरकारने जे आरक्षण दिलं ते ज्यांना कुणबी आरक्षण नको आहे त्यांच्यासाठी आहे मात्र जोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत सरकारची सुट्टी नाही. अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

चंदीगड : विनोद तावडेंची सलग तिसऱ्या वर्षी चालाखी… पण सर्वोच्च न्यायालयाने डाव उधळला!

सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर आज मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील समन्वयक आणि आंदोलकांची बैठक बोलावली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जरांगे म्हणाले की, करोडो मराठ्यांची ओबीसी मधूनच आरक्षणाची मागणी आहे. तसेच कोकणामध्ये कुणबी आणि मराठा एकच असल्याने अनेक जण कुणबी नको म्हणून रुसले होते जे रुसले होते.

Lok Sabha 2024 : मनसे-भाजप युती फिक्स? राज ठाकरेंच्या शिलेदारानं सांगितली ‘खास बात’

ज्यांना कुणबी म्हणून आरक्षण नको होतं. त्यांना काल आरक्षण मिळालं आता विरोध करणारे कोणी राहिले. नाहीत मग सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला हरकत काय? तसेच सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याशिवाय सरकारची सुट्टी नाही. तसेच कुणबी आणि मराठी एकच असल्याचा एकाच ओळींचा कॅबिनेट निर्णय आवश्यक असल्याचे मागणी यावेळी जरांगे पाटील यांनी केली.

राज्य विधिमंडळाच्या विशेष (Maratha Reservation) अधिवेशनात काल (20 फेब्रुवारी) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडले. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यानंतर विधेयकावर मतदान होऊन विधेयक मंजूर झाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केली. ओबीसी बांधव असो की अन्य कोणताही समाज असो आम्ही कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज